शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 16:59 IST

S Jaishankar: खालिस्तान दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला आहे.

S Jaishankar slams Canada: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची कॅनडात हत्या झाली. तेव्हापासून भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले आहेत. अशातच कॅनडा पोलिसांनी याप्रकरणी 3 जणांना अटक केली असून, हे तिघेही भारतीय असल्याचे कॅनडा पोलिसांचे म्हणणे आहे. यामुळे आता परत एकदा भारत आणि कॅनडामध्ये वाकयुद्ध सुरू झाले आहे. आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी प्रकरणावरुन कॅनडा सरकार आणि पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

फक्त आरोप नको, पुरावे दाखवाओडिशातील एका कार्यक्रमात बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले की, कॅनडा त्यांच्या देशात होत असलेल्या गुन्ह्यांसाठी भारताला जबाबदार धरतो. पण, ते कधीही पुरावे देत नाही. मी ऐकले की, कॅनडा पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आता कॅनडाने त्या तिघांबद्दल आम्हाला अधिक माहिती द्यावी, आम्ही त्याचीच वाट पाहत आहोत. फक्त आरोप करण्यापेक्षा कॅनडा सरकारने पुरावे सादर करावे. त्यांनी आतापर्यंत असा कुठलाही पुरावा दिला नाही, ज्यामुळे या प्रकरणात भारताचा सहभाग सिद्ध होईल. आम्ही कॅनडा सरकारला वारंवार पुरावे दाखवण्याची मागणी केली आहे. 

कॅनडाच्या सरकारवर गंभीर आरोपपंजाबमधील संघटित गुन्ह्यांशी संबंधित गुन्हेगारांना व्हिसा दिल्याबद्दल एस जयशंकर यांनी कॅनडाच्या सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, पंजाबमधील संघटित गुन्हेगारीशी संबंधित अनेकांना कॅनडात राहण्याची परवानगी दिली जाते. आम्ही कॅनडाला वारंवार सांगतो की, भारतातील वॉन्टेड गुन्हेगारांना व्हिसा देऊ नका. अनेक लोक खोट्या कागदपत्रांवर कॅनडाला जातात आणि तेथील सरकार  त्यांना राहण्याची परवानगी देते. भारताने 25 खलिस्तानी समर्थकांची माहिती कॅनडाला दिली आणि त्यांच्या प्रत्यार्पणाची विनंती केली, परंतु कॅनडाने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी कॅनडावर केला. 

कॅनडा भारतासाठी मोठी समस्यापरराष्ट्रमंत्र्यांनी कॅनडा ही भारताची सर्वात मोठी समस्या असल्याचे म्हटले. ते म्हणाले, आज कॅनडामध्ये जे सरकार आहे, त्यांनी स्वातंत्र्याच्या नावाखाली अतिरेकी, फुटीरतावाद आणि हिंसाचाराचा पुरस्कार करणाऱ्यांना आसरा दिला आहे. अशा लोकांनी स्वतःला राजकीयदृष्ट्या संघटित केले आहे आणि एक राजकीय लॉबी बनवली आहे. यापैकी अनेकांनी तिथल्या राजकारण्यांचा विश्वास मिळवला आहे. अमेरिकेत अशाप्रकारची समस्या नाही, सध्या भारताची सर्वात मोठी समस्या कॅनडा आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरCanadaकॅनडाJustin Trudeauजस्टीन ट्रुडोIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय