शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जयशंकर यांनी दलाल म्हटल्याने पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या, हिना रब्बानी खार म्हणाल्या...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 19:54 IST

Iran War News: भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पाकिस्तानचा उल्लेख दलाल असा केला होता. जयशंकर यांनी केलेला हा उल्लेख पाकिस्तानला चांगलाच झोंबला आहे. तसेच पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी एस. जयशंकर यांच्या वक्तव्याला तीव्र आक्षेप घेतला आहे.

अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावण्यासाठी पाकिस्तानकडून प्रयत्न सुरू असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. यावरून भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पाकिस्तानचा उल्लेख दलाल असा केला होता. जयशंकर यांनी केलेला हा उल्लेख पाकिस्तानला चांगलाच झोंबला आहे. तसेच पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी एस. जयशंकर यांच्या वक्तव्याला तीव्र आक्षेप घेतला आहे. जयशंकर यांनी केलेलं विधान चुकीचं आहे. तसेच अशा प्रकारचा विचार पूर्ण प्रदेशाला प्रभावित करू शकतो, असे खार यांनी म्हटले आहे.

इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये इराण युद्धातील पाकिस्तानच्या कथित मध्यस्थतेचा विषय आला तेव्हा एस. जयशंकर यांनी भारत या प्रक्रियेत नाही आहे. कारण आम्ही दलाल देश नाही आहोत, असे सांगितले होते. त्यावरच आता हिना रब्बानी यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच त्यांनी जयशंकर यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत टीका केली आहे. हा संपूर्ण भाग असे लोक आणि त्यांच्या राजकीय नाट्यामुळे ओलीस धरला गेला आहे, हे पाहून दु:ख होत आहे, असे रब्बानी खार म्हणाल्या.

हिना रब्बानी यांच्याआधी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी शुक्रवारी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. आम्ही भारताने केलेल्या वक्तव्याचं खंडन करतो. अशा प्रकारची वक्तव्ये भारताची हताशा दर्शवत आहेत. तसेच जेव्हा तर्क कमी पडतात, तेव्हा अपशब्दांचा आधार घेतला जातो, असेही ते म्हणाले होते.   

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतPakistanपाकिस्तानIranइराण