पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव सुरू आहे. भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत दहशतवाद्यांचे तळांवर हल्ला केला. पाकिस्ताननेही सीमेवर गोळीबार सुरू केला होता. दरम्यान, आता युद्धविरामची घोषणा केली आहे. दरम्यान, आता भारताने सुरक्षा आणि प्रत्युत्तरासाठी सैन्याला हाय अलर्टवर ठेवले आहे. बंगालमधील सिलिगुडी येथे ३३ आर्मी कॉर्प्स आहेत. इथेही सैन्य पूर्णपणे सतर्क आहे.
ईशान्येकडील सात राज्यांना जोडणारा, सिलिगुडी कॉरिडॉर म्हणून ओळखला जाणारा चिकन नेक हा धोरणात्मकदृष्ट्या खूप महत्त्वाचा बनला आहे. भारतीय लष्कर सुदर्शन चक्र संरक्षण प्रणालीद्वारे सुरक्षा घेरा मजबूत करण्याची तयारी करत असताना, बंगाल पोलिसांचा गुप्तचर विभागही दिवसरात्र गस्त घातल आहे.
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
सिलिगुडी कॉरिडॉरमध्ये सुदर्शन चक्र तैनात
भारतीय लष्कराने सिलिगुडी कॉरिडॉरमध्ये सुदर्शन चक्र हवाई संरक्षण प्रणाली तैनात करण्याची तयारी केली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, या यंत्रणेने पाकिस्तानी हवाई हल्ले रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी लष्कर आणि गुप्तचर विभाग सज्ज आहेत. राज्य पोलिस गुप्तचर विभागाचे एडीजी ज्ञानवंत सिंह यांनी काही दिवसापूर्वी सिलिगुडीला भेट दिली. एडीजींच्या सूचनांनंतर, स्थानिक पोलिस आणि सुरक्षा संस्था सीमावर्ती भागात दक्षता वाढवत आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर, उत्तर बंगालच्या सीमावर्ती भागात बांगलादेशी घुसखोरी वाढली आहे. गेल्या एका आठवड्यात बीएसएफ आणि पोलिसांनी १५ हून अधिक बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे.
पाकिस्तानी आणि चिनी सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अलीकडेच बांगलादेशच्या रंगपूर आणि लालमणी हाट विभागांना भेट दिली आहे. बांगलादेश या भागात एक हवाई तळ बांधण्याची योजना आखत आहे, तो तळ युद्धाच्या बाबतीत पाकिस्तान आणि चीनच्या सैन्याद्वारे वापरला जाऊ शकतो.