अश्लिल चाळे करणाऱ्या रशियन प्रवाशाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:58 IST2018-05-21T00:58:36+5:302018-05-21T00:58:36+5:30
तो विमानात या महिलेच्या शेजारी बसला होता.

अश्लिल चाळे करणाऱ्या रशियन प्रवाशाला अटक
नवी दिल्ली : इस्तंबुलहून दिल्लीला आलेल्या टर्किश एअरलाइन्सच्या विमानात भारतीय महिलेच्या शेजारी बसून अश्लिल चाळे करणाºया एका रशियन प्रवाशाला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी अटक करण्यात आली. या रशियन प्रवाशाबद्दल भारतीय महिलेने दिल्ली पोलिसांना दूरध्वनी करुन तक्रार केली होती. हे विमान दिल्ली विमानतळावर उतरताच सीआयएसएफचे जवान तिथे गेले व त्यांनी रशियन प्रवाशाला ताब्यात घेऊन दिल्ली पोलिसांच्या हवाली केले.
तो विमानात या महिलेच्या शेजारी बसला होता. विमानाने उड्डाण घेताच काही वेळाने या प्रवाशाने अश्लिल चाळे सुरु केले. महिलेने विमान कर्मचाºयांकडे याची तक्रार केल्यानंतर त्या प्रवाशाला दुसºया आसनावर बसविण्यात आले होते. (वृत्तसंस्था)