संरक्षण क्षेत्रात रशिया भारताचा प्रमुख भागीदार राहील - नरेंद्र मोदी
By Admin | Updated: December 11, 2014 16:33 IST2014-12-11T15:52:36+5:302014-12-11T16:33:04+5:30
संरक्षण क्षेत्रात भारतासमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले असले तरी गेल्या कित्येक दशकांपासून भारताचा प्रमुख भागीदार असलेला रशिया यापुढेही संरक्षण क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावेल आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

संरक्षण क्षेत्रात रशिया भारताचा प्रमुख भागीदार राहील - नरेंद्र मोदी
>
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - संरक्षण क्षेत्रात भारतासमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले असले तरी गेल्या कित्येक दशकांपासून भारताचा प्रमुख भागीदार असलेला रशिया यापुढेही संरक्षण क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावेल आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. भारत-रशिया द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्याच्या इराद्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात आज वार्षिक शिखर बैठक पार पडली.
या बैठकीदरम्यान दोन्ही देशांदरम्यान अणुउर्जा, तेल व वायू, सैन्यदल प्रशिक्षण यांच्यासह १६ करारांवर स्वाक्ष-या झाल्या.
रशियाने भारतात अत्याधुनिक हेलिकॉप्टर बनवणारा कारखाना उभारण्याचा निर्णय घेतला आहे असे मोदींनी सांगितले. तसेच रशियाच्या साथीने भारतात दहाहून अधिक अणुउर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.
दहशतवाद व उग्रवाद यांच्याशी लढणे ही आमची प्राथमिकता असल्याचे मत मोदींनी यावेळी व्यक्त केले. मेक इन इंडिया मोहिमेस रशियाचा पाठिंबा असल्याचे सांगत या मोहिमेला मजबूती मिळेल असेही ते म्हणाले. दोन्ही देशांमधील सहकार्य व एक-दुस-याच्या हितासाठी असलेली मजबूत संवेदनशीलता ही दोन्ही देशांसाठी ताकद ठरेल, असेही ते म्हणाले.