शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
2
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
3
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
4
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
5
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
8
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
9
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
10
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
11
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
12
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
13
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
14
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
15
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
16
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
17
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
18
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
19
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
20
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine Conflict: ॲापरेशन गंगा: आठवे विमान २१८ विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीत दाखल; आता वायुसेनाही होणार सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 05:29 IST

Russia-Ukraine Conflict: रशियाचे हल्ले तीव्र झाल्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त भारतीयांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी वायुसेनेला माेहिमेत सहभागी हाेण्याचे आदेश दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली :  रशियाचे हल्ले तीव्र झाल्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त भारतीयांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी वायुसेनेला माेहिमेत सहभागी हाेण्याचे आदेश दिले आहेत. वायुसेनेचे सी-१७ ग्लाेबमास्टर हे भव्य विमान पाठविण्यात येणार आहे. अफगाणिस्तानातील संघर्षादरम्यान या विमानाद्वारे एकाच वेळी ६४० जणांना सुखरूप परत आणण्यात आले हाेते. 

ऑपरेशन गंगा माेहिमेतील आठवे विमान २१८ विद्यार्थ्यांना घेऊन हंगेरीच्या बुडापेस्ट येथून नवी दिल्लीत दाखल झाले, तर नववे विमान २१८ भारतीयांना घेऊन बुखारेस्ट येथून नवी दिल्लीकडे झेपावले. आतापर्यंत ८ विमानांद्वारे १,८३६ भारतीयांना परत आणण्यात आले आहे.

रशियाकडून हल्ले आणखी तीव्र, ७० युक्रेनी सैनिकांचा मृत्यू

रशियाने कीव्ह आणि खारकीव्ह जवळच्या ओख्तिरका शहरातील लष्करी तळावर हल्ला केला. या ठिकाणी ७० युक्रेनी सैनिक ठार झाले आहेत. रशियाने युद्धात प्रतिबंधित शस्त्रांचा वापर केल्याचा आराेप युक्रेनने केला आहे. रशियाने व्हॅक्युम बाॅम्बचा वापर केल्याचा दावा केला असून, पारंपरिक शस्त्रापेक्षा हा ७ ते ८ पट घातक बाॅम्ब आहे.

कीव्हच्या दिशेने रशियाचा ६५ किलाेमीटर लांब लष्करी ताफा 

कीव्ह आणि खारकीव्हसाेबतच रशियाने चर्निहाईव्हमध्ये ताेफांचा वापर करून तीव्र हल्ले केले आहेत. उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रात रशियन सैन्याचे रणगाडे, ट्रक व इतर लष्करी वाहनांचा ६५ किलाेमीटर लांब ताफा दिसून आला. हा ताफा कीव्हपासून २७ किलाेमीटर अंतरावर एंटाेनाेव्ह विमानतळाजवळ पाेहाेचला आहे.

चर्चेशिवाय पर्याय नाही : भारताची भूमिका

- युक्रेनमधील बिघडणाऱ्या परिस्थितीबाबत भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये चिंता व्यक्त केली असून, तातडीने हिंसाचार थांबवून चर्चेद्वारे प्रश्न साेडविण्याचे आवाहन केले. भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी संयुक्त राष्ट्राच्या आपत्कालीन बैठकीत सांगितले, की  हिंसाचार साेडून चर्चेच्या मार्गावर येण्याशिवाय पर्याय नाही.

- भारतीयांना तेथून सुरक्षितपणे परत आणण्यास आमची सर्वाेच्च प्राथमिकता आहे; परंतु विविध सीमांवरील परिस्थितीमुळे बचाव माेहिमेवर परिणाम हाेत आहे. याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, असे तिरुमूर्ती म्हणाले.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाindian air forceभारतीय हवाई दलAir Indiaएअर इंडिया