शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukrain: तो आता मोदींचाच मुलगा, युक्रेन रिटर्न लेकाला पाहून गहिवरला 'बाप'माणूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 15:39 IST

मी असं म्हणेल की माझा मुलगा परत नाही आला, मोदींचा मुलगा आलाय.

नवी दिल्ली - युक्रेनमधून ऑपरेशन गंगा या मोहिमेतंर्गत देशातील नागरिकांची देशवापसी करण्यात येत आहे. जवळपास 18 हजार भारतीयांना मायदेशी आणण्यात भारत सरकारला यश आलं आहे. त्यामुळे, गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या मुलांच्या चिंतेत असलेल्या पालकांचा जीव भांड्यात पडला आहे. आजही राजधानी दिल्ली विमानतळावर आपल्या पाल्यांना घेण्यासाठी पालक पोहोचले होते. त्यावेळी, श्रीनगरच्या एका पित्यास अश्रू अनावर झाले. तर, मोदींमुळेच माझा मुलगा परत आला, असेही त्यांनी बोलून दाखवले. 

मी असं म्हणेल की माझा मुलगा परत नाही आला, मोदींचा मुलगा आलाय. कारण, मोदींनी माझ्या मुलास भारतात परत आणलंय. आम्हाला आशाच नव्हती, सुमी शहरात जी परिस्थिती पाहात होतो. त्यावरुन, आम्ही आशाच सोडून दिली होती. मी भारत सरकारचे आभार मानतो, त्यांनी माझा मुलगा मला परत मिळवून दिला, असे म्हणत काश्मीर निवासी संजय पंडिता यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. संजय यांचा मुलगा ध्रुव हा युक्रेनच्या सुमी शहरात अडकला होता. माझ्या भावाने मुलाला विचारलं बेटा तुला खायला काय आणू, तर मुलाने केवळ पाणी मागितलं. म्हणजे गेल्या कित्येक दिवसांपासून ते पाणीही पिऊ शकले नाहीत, बर्फ वितळवून ते पाणी पित होते. म्हणून, पाण्याची बाटली घेऊन आम्ही आलोय, असेही भावनाविवश झालेल्या पित्याने म्हटले. 

दरम्यान, युक्रेनमधून सुमारे २० हजार भारतीय बाहेर पडले असून, ‘ऑपरेशन गंगा’द्वारे आतापर्यंत ४८ पेक्षा अधिक फेऱ्यांद्वारे १० हजारांपेक्षा जास्त भारतीयांना परत आले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय वायू सेनेकडून आणि इतर विमानांच्या फेऱ्या करण्यात येत आहे. आज दिल्ली विमानतळावर काही विमानांचे लँडींग झाले. त्यावेळी, मुलांना पाहून पालक भावूक झाले होते.  

 

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाAirportविमानतळStudentविद्यार्थीIndiaभारत