रशिया भारताचा विश्वासू मित्र -पंतप्रधान मोदी
By Admin | Updated: June 20, 2014 03:04 IST2014-06-20T03:04:08+5:302014-06-20T03:04:08+5:30
रशिया हा नेहमीच काळाच्या कसोटीवर खरा उतरणारा भारताचा विश्वासू मित्र राहिला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी येथे म्हणाल़े

रशिया भारताचा विश्वासू मित्र -पंतप्रधान मोदी
>नवी दिल्ली : रशिया हा नेहमीच काळाच्या कसोटीवर खरा उतरणारा भारताचा विश्वासू मित्र राहिला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी येथे म्हणाल़े येत्या काळात रशियासोबतचे संबंध आणखी दृढ करण्यावर त्यांनी जोर दिला़
रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री रोगोजिन सध्या भारताच्या भेटीवर आले आहेत़ रोगोजिन यांनी आज मोदींची भेट घेतली़ पंतप्रधान कार्यालयाने एक निवेदन जारी करून यावेळी उभयतात झालेल्या चर्चेची माहिती दिली़ रशिया हा नेहमीच भारताचा सच्चा मित्र राहिला आह़े कठीण काळात या देशाने नेहमी भारताची मदत केली आहे, असे मोदी म्हणाल़े भारत-रशिया संबंध आणखी दृढ करण्याची इच्छाही मोदींनी बोलून दाखविली़ रोगोजिन यांनी यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमिर पुतीन यांच्यावतीने अभिवादन केल़े तसेच भारतासोबतचे संबंध आणखी वृद्धिंगत करण्यास रशिया कटिबद्ध असल्याचे सांगितल़े यावेळी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, परराष्ट्र सचिव सुजातासिंह, पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेन्द्र मिश्र आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचा समावेश आह़े
(लोकमत न्यूज नेटवर्क)