रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला, युक्रेन युद्धावर झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 08:39 PM2023-06-30T20:39:36+5:302023-06-30T20:39:51+5:30

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केली.

russia president putin call to pm modi phone call ukraine war | रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला, युक्रेन युद्धावर झाली चर्चा

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला, युक्रेन युद्धावर झाली चर्चा

googlenewsNext

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये युक्रेन युद्धासह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी रशियाच्या नेतृत्वाखाली उचललेल्या पावलांना पंतप्रधान मोदींनी पाठिंबा दिला.

या संवादादरम्यान पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना रशियातील सद्यस्थिती आणि ताज्या घडामोडींची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, युक्रेन कोणत्याही प्रकारच्या करारासाठी राजकीय आणि राजनैतिक पावले उचलण्यास नकार देत आहे. यावेळी मोदींनी 'संवाद' आणि 'मुत्सद्देगिरी' या त्यांच्या धोरणावर भर दिला.

दोन्ही नेत्यांमधील संभाषणादरम्यान, पीएम मोदींनी २४ जून रोजी रशियामध्ये वॅग्नर आर्मीच्या विद्रोह आणि सत्तापालटाच्या प्रयत्नासंदर्भात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे समर्थन केले. रशियामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी पुतिन यांच्या नेतृत्वाखाली उचललेल्या पावलांचेही त्यांनी समर्थन केले.

दोन्ही जागतिक नेत्यांनी विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याच्या मुद्द्यावर भर दिला. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) आणि G-20 वरही चर्चा झाली.

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेन युद्धाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. युक्रेन हे युद्ध सोडवण्यासाठी कोणत्याही प्रकारची राजकीय आणि राजनैतिक पावले उचलण्यास नकार देत असल्याचे त्यांनी सांगितले. पुतिन आणि मोदी यांनी भारत-रशिया संबंधांना पुढील स्तरावर नेण्यासाठी आणि त्यांची धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी सतत संपर्कात राहण्यासाठी वचनबद्ध केले.

याआधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र म्हणून कौतुक केले होते. रशियातील देशांतर्गत उत्पादने आणि ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी भारताचे उदाहरण दिले. पुतिन यांनी 'मेक इन इंडिया' संकल्पनेचे कौतुक केले आणि भारताला त्याचे सकारात्मक परिणाम मिळाल्याचे सांगितले. यादरम्यान पुतिन म्हणाले होते की, युक्रेन युद्धानंतर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा रशियन बाजारावर कोणताही परिणाम झालेला नाही. पुतिन म्हणाले होते की, आमचे मित्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेक इन इंडिया'ची संकल्पना सुरू केली होती. याचे सकारात्मक परिणाम भारताला मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मेक इन इंडिया' संकल्पनेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर 'स्पष्ट परिणाम' झाला आहे, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे.

Web Title: russia president putin call to pm modi phone call ukraine war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.