शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

रुपया गेला ७४ पार; तरीही गोयल म्हणतात, 'हा तर सुवर्णकाळ'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 6:35 PM

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया वाईट परिस्थितीत असून, रुपया प्रतिडॉलर 74 रुपयांजवळ पोहोचला आहे.

नवी दिल्ली- अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया वाईट परिस्थितीत असून, रुपया प्रतिडॉलर 74 रुपयांजवळ पोहोचला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयानं गाठलेली ही आतापर्यंतची सर्वात खालची पातळी आहे. यावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरानं तणाव घेण्याची गरज नाही. ही आपली सुवर्णकाळाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे, असं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले आहेत. गेल्या 15 वर्षांतला भारतीय रुपयासाठी हा सर्वात चांगला काळ आहे. पीयूष गोयल हे हिंदुस्तान लीडरशिप समीटमध्ये बोलत होते.समीटमध्ये अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या स्थितीवर गोयल म्हणाले, किरकोळ घसरणीनंतर रुपया मजबूत झाला आहे. गेल्या 5 वर्षांत रुपयाच्या मूल्यात फक्त 7 टक्के कपात झाली आहे. सध्याची स्थिती भारतीय रुपयासाठी फार चांगली आहे. रुपयाचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असताना पीयूष गोयल यांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे देशातून होणाऱ्या वारेमाप तेलाच्या आयातीमुळे देश आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हणले होते. भाजपा या दोन्ही मंत्र्यांची विधानं एकमेकांशी विसंगत आहेत. चलन बाजारात रुपयाने डॉलरसमोर शरणागती पत्करली असतानाच 74च्या नीचांकी स्तराला स्पर्श केला आहे.खनिज तेलाची आयात करणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश आहे. भारतातील एकूण आवश्यकतेपैकी 80 टक्के खनिज तेल हे आयात केले जाते. त्यातच या वर्षाच्या सुरुवातीपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यामध्ये 13 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे तेलाच्या आयातीवर होणारा खर्चही वाढला आहे. तर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये होणाऱ्या वाढीमुळे पसिस्थिती अधिकच बिघडली आहे.   

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयल