टायमर बॉम्बच्या संदेशाने रेल्वे स्थानकावर मध्यरात्री धावपळ
By Admin | Updated: November 22, 2015 00:41 IST2015-11-22T00:41:25+5:302015-11-22T00:41:25+5:30
जळगाव: पोरबंदर-सांतराकांछी १२९४९ या कवीगुरु एक्सप्रेसमध्ये टायमर बॉम्ब असल्याचा संदेश मिळाल्याने शुक्रवारच्या मध्यरात्री व शनिवारच्या पहाटे जळगाव रेल्वे स्थानकावर प्रचंड धावपळ उडाली. बॉम्ब शोधक व श्वान पथकामार्फत गाडीची तपासणी होत असताना प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दीड तासाच्या तपासणीनंतर गाडीत कोणतीही आक्षेपार्ह वस्तू नसल्याचे जाहिर झाल्यावर प्रवाशांच्या जीवात जीव आला.

टायमर बॉम्बच्या संदेशाने रेल्वे स्थानकावर मध्यरात्री धावपळ
ज गाव: पोरबंदर-सांतराकांछी १२९४९ या कवीगुरु एक्सप्रेसमध्ये टायमर बॉम्ब असल्याचा संदेश मिळाल्याने शुक्रवारच्या मध्यरात्री व शनिवारच्या पहाटे जळगाव रेल्वे स्थानकावर प्रचंड धावपळ उडाली. बॉम्ब शोधक व श्वान पथकामार्फत गाडीची तपासणी होत असताना प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दीड तासाच्या तपासणीनंतर गाडीत कोणतीही आक्षेपार्ह वस्तू नसल्याचे जाहिर झाल्यावर प्रवाशांच्या जीवात जीव आला.गुजरातकडून येणार्या कवीगुरु एक्सप्रेसमध्ये टायमर बॉम्ब असल्याचा संदेश येथील जीआरपीला मध्यरात्री त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आला. त्यामुळे जीआरपी व आरपीएफ यांच्यात प्रचंड खळबळ उडाली. आरपीएफचे निरीक्षक गोकुळ सोनोने यांनी तत्काळ बॉम्ब शोधक पथकला (बीडीडीएस) पाचारण केले. भुसावळ येथील आरपीएफ इंटेलीजन्सलाही कळविले. बीडीडीएसचे बडगुजर यांनी सनी व रॉली तर भुसावळच्या आरपीएफचे सहायक फौजदार जाधव यांनी सुर्या नावाच्या श्वानाला पाचारण केले. इंटेलीजन्सचे रोशनसिंग हे देखील भुसावळहून दाखल झाले. यंत्रणा सज्जगाडी प्लॅटफार्मवर येण्याची आधी सर्व यंत्रणा सज्ज झाली होती. त्यानुसार ही एक्सप्रेस रात्री २.१५ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक चारवर आली. सुरुवातीला प्रवाशांना कोणतीच माहिती सांगण्यात आली नाही. २.१५ ते.३.४० असा दीड तास प्रत्येक बोगीत श्वान व बीडीडीएसकडून तपासणी होत असल्याने प्रवाशांना बॉम्बची कुणकुण लागली. निरीक्षक गोकुळ सोनोने, उपनिरीक्षक एस.पी.यादव, जीआरपीचे उपनिरीक्षक खलील शेख यांनी तपासणी करतांनाच प्रवाशांना दिलासा दिला. इंजिनपासून तर शेवटच्या बोगीपर्यंत सर्व बोग्या तपासल्यानंतर त्यात काहीच आक्षेपार्ह न आढळल्याने या अधिकार्यांनी तपासणीचे कारण स्पष्ट केले. प्रमाणपत्रानंतर गाडी रवानाबीडीडीएसचे प्रमाणपत्र जीआरपीला मिळाल्यानंतर गाडी पुढच्या प्रवासाला रवाना झाली. तपासणीअंती गाडीत कोणतीच आक्षेपार्ह वस्तु आढळली नाही असे प्रमाणपत्र बीडीडीएसने जीआरपीला दिले. त्यानंतर त्यांनी हे प्रमाणपत्र स्टेशन मास्तरला दिले व नंतर गाडीला हिरवा सिग्नल देण्यात आला.नंदुरबारला ४५ मिनिटे तपासणीजळगावला येण्याआधी नंदुरबारलाही ४५ मिनिटे गाडी थांबवून त्याची तपासणी करण्यात आली. तेथही श्वानच्या माध्यमातून तपासणी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बॉम्बच्या अफवेमुळे गाडीला अडीच तास उशिर झाला. पहिला संदेश गुजरातमध्ये देण्यात आला होता. त्यानंतर जळगावला हा संदेश देण्यात आला.