शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत राडा...! राहुल गांधींवर एफआयआर दाखल करण्याची भाजपाची तयारी; Video शोधायला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 12:33 IST

Rahul Gandhi, Pratap Sarangi News: प्रताप सारंगी व अन्य एका भाजप खासदाराला दिल्लीच्या आरएमएल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सारंगी यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. तर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांचा धिक्कार केला आहे.

संसद परिसरात अमित शाह यांनी केलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलच्या वक्तव्यावरून आज जोरदार राडा झाला आहे. राहुल गांधी व त्यांच्या खासदारांना संसदेत जाण्यापासून अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदारांना राहुल गांधी यांनी धक्का दिल्याने भाजपाचे दोन खासदार जखमी झाले आहेत. भाजपा खासदार प्रताप सारंगी हे खाली पडल्याने जखमी झाले आहेत. राहुल गांधींनी आंदोलन करणाऱ्या प्रियांका गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांना भाजप खासदार वाईट वागणूक देत होते, मला संसदेत जाण्यापासून रोखत होते, असा आरोप केला आहे. आता भाजपा राहुल गांधी यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची तयारी करत आहे.

भाजप खासदार प्रताप सारंगी लोकसभेत पडले, डोक्याला दुखापत; राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप

प्रताप सारंगी व अन्य एका भाजप खासदाराला दिल्लीच्या आरएमएल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सारंगी यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. तर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांचा धिक्कार केला आहे. 

मी राहुल गांधी यांना विचारू इच्छितो की,  संसद ही काय शारीरिक दाकद दाखविण्याची जागा आहे का? जर सर्व लोक आपली ताकद दाखवायला लागले तर संसद कशी चालेल, पैलवानी दाखविण्याचा अर्थ काय आहे, ही कराटे, कुंगफू खेळायची जागा नाही की कोणा राजाची खासगी संपत्ती नाही. लोकशाहीचे मंदिर आहे. संसद काही कुस्तीचे मैदान नाही, बॉक्सिंगचा आखाडा नाही, अशा शब्दांत रिजिजू यांनी फटकारले आहे. 

या धक्काबुक्कीनंतर भाजपा आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या धक्काबुक्कीचे व्हिडीओ शोधले जात आहेत. धक्का दिल्याचा आरोप तपासून जर व्हिडीओत तसे आढळले तर भाजपा राहुल गांधी यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची तयारी करत असल्याचे सूत्रांनी आजतकला सांगितले आहे. 

सारंगी यांनी आपण संसदेच्या पायऱ्यांवर बाजुला उभे होतो, असे सांगितले आगे. तर राहुल गांधी यांनी हे आरोप फेटाळत संसदेत जात असताना भाजपाच्या खासदारांनी मला ढकलले आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तसेच खर्गे यांनाही धक्का दिल्याचे म्हटले आहे. धक्काबुक्की केल्याने आम्हाला काही होत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच कॅमेऱ्यामध्ये सारे कैद झाले आहे, असेही ते म्हणाले आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेस