शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

रा. स्व. संघच चालवत आहे मोदी सरकार; राहुल गांधींचा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 17:09 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा भाजपा आणि आरएसएसवर टिका केली आहे.

बंगळुरु - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा भाजपा आणि आरएसएसवर टिका केली आहे. केंद्रातील मोदी सरकार आरएसएस चालवत आहे, प्रत्येक मंत्रालय आणि विभागात आरएसएसची लोक असल्याचा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी आज केला आहे.  

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. येथे भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट टक्कर आहे. काँग्रेस आपली गादी राखण्याचा प्रयत्न करत असून भाजपा कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील असेल. चार दिवसांपासून राहुल गांधी कर्नाटकाच्या दौऱ्यावर आहेत.  आज त्याचा शेवटचा दिवस होता. कर्नाटक येथील प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राहुल गांधी यांनी आज बिजनेस लीडर्स आणि प्रोफेशनल्ससोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी संघ आणि भाजपा सरकारवर टिका केली. ते म्हणाले की, सध्या मोदी सरकार संघ चालवत आहे. मंत्रालयातील प्रत्येक विभागात त्यांचे लोक आहेत. सचिव पदाची नियुक्तीही आरएसएसचे करतेय.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, निती आयोगामध्येही आरएसएसचे लोक आहेत. भाजपाचा भारतातील प्रत्येक इंस्टीट्यूशन कॅप्चर करण्याचा प्रयत्न आहे. भारताची विदेश नितीही त्यामुळंच खराब होत आहे. चीन आपल्या शेजारील सर्व देशांवर आपला धाक जमवून बसला आहे आणि भारत एकटाच पडला आहे. 

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी व्यापाऱ्यांना जीएसटी कमी करु असे अश्वासन दिले. ते म्हणाले की, 2019 मध्ये जर आम्ही सत्तेत आलो तर या किचकट आणि कठीण जीएसटीमधून मुक्ताता करु. तसेच टॅक्स स्लॅब आणखी कमी करु. यावेळी त्यांनी नोटाबंदीही आरबीआयची नसून आरएसएसची असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

 

भाजपाकडून सत्याची अपेक्षा ठेवणे चुकीचेच, कर्नाटकात राहुल गांधी यांची टीका

भाजपा हा खोटे बोलणा-या मंडळींचा पक्ष असून, त्यांच्याकडून तुम्ही सत्याची अपेक्षा ठेवूच शकत नाही, तरुणांना रोजगार, शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव, काळ्या पैशाला आळा, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये अशी सारीच भाजपा व नरेंद्र मोदी यांची आश्वासने खोटी ठरली आहेत, अशी टीका करीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील निवडणूक प्रचारात केली.कर्नाटकातील निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या, तरी तिथे काँग्रेस व भाजपा दोघांनीही प्रचार सुरू केला आहे. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेऊ न कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर टीका केली होती. त्याचा थेट उल्लेख न करताच, सिद्धरामय्या सरकारने राबवलेल्या अनेक विकास कामे व योजनांविषयी बोलताना राहुल गांधी यांनी भाजपाने दिलेली आश्वासने कशी खोटी ठरली, हे नमूद केले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाMohan Bhagwatमोहन भागवतcongressकाँग्रेस