शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 09:38 IST

RSS on BJP : इंद्रेश कुमार म्हणाले, "परमेश्वराचा न्याय खरा आणि आनंददायी असतो. जे लोक त्याची उपासना करतात त्यांनी नम्र रहायला हवे आणि जे विरोध करतात परमेश्वर स्वतः त्यांच्याकडे बघतो.

निवडणुकीचा निकाल त्यांची (भाजप) वृत्ती दिर्शवतो. ते अहंकारी झाले होते. यामुळेच प्रभू रामचंद्रांनी त्यांना 241 वरच रोखलं, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांनी भाजपवर निशाणा साधला. ते जयपूर जवळील कनोता येथे आयोजित 'रामरथ अयोध्या यात्रा दर्शन पूजन समारंभादरम्यान बोलत होते.

इंद्रेश कुमार कुणाचेही नाव न घेता म्हणाले, "निवडणुकीचा निकाल त्यांची वृत्ती दिर्शवतो. ते अहंकारी झाले होते. पक्षाने आधी भक्ती केली, त्यानंतर ते अहंकारी झाले. प्रभू रामचंद्रांनी त्यांना 241 वरच रोखले. मात्र, सर्वात मोठा पक्ष बनवले. इंद्रेश कुणार यांचा रोख भाजपकडे होता. याशिवाय, ज्यांचा प्रभू रामचंद्रांवर विश्वास नव्हता त्यांना 234 वरच थांबवले, असेही ते म्हणाले. म्हणजेच I.N.D.I.A. आघाडी.

अहंकारी झाले होते म्हणून... -इंद्रेश कुमार म्हणाले, लोकशाहीत रामराज्याचे विधान बघा, त्यांनी रामाची पूजा केली, पण हळूहळू अहंकारी झाले. सर्वात मोठा पक्ष बनला, मात्र, जी मते मिळायला हवी होती ती प्रभू रामाने अहंकारामुळे रोखली. तसेच, रामचंद्रांना विरोध करणाऱ्यांना सत्ता मिळू शकली नाही. ते सर्व मिळून दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

प्रभू रामचंद्र भेदभाव करत नाहीत -  इंद्रेश कुमार म्हणाले, "परमेश्वराचा न्याय खरा आणि आनंददायी असतो. जे लोक त्याची उपासना करतात त्यांनी नम्र रहायला हवे आणि जे विरोध करतात परमेश्वर स्वतः त्यांच्याकडे बघतो. प्रभू रामचंद्र भेदभाव करत नाही अथवा शिक्षाही करत नाहीत. राम कोणाला शोकही करवत नाहीत. ते सर्वांना न्याय देतात. ते देतात आणि देत राहतील. प्रभू राम नेहमीच न्यायी होते आणि राहतील. एवढेच नाही तर, एकीकडे त्यांनी प्रजेचे रक्षणही केले आणि दुसरीकडे रावणाचे भलेही केले, असेही इंद्रेश कुमार म्हणाले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४