शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"PM मोदींना संघ पर्याय शोधतोय; जबरदस्तीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न  केला तरी...", संजय राऊत यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 15:19 IST

माझ्या माहितीप्रमाणे, संघाची टॉप लिडरशीपही पर्यायाच्या चाचपणीसंदर्भात काम करताना दिसते आहे, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग सरळ नाही. त्यांनी जबरदस्तीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न  केला तरी ते सरकार टीकणार नाही. त्यांना पक्षातच विरोध आहे. मुळात नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला आहे. पराभूत झालेला माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो? असा सावल करत, माझ्या माहितीप्रमाणे, संघाची टॉप लिडरशीपही पर्यायाच्या चाचपणीसंदर्भात काम करताना दिसते आहे, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ते दिल्लीत पत्रकारांसोबत बोलत होते.  संजय राऊत म्हणाले, "माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग सरळ नाही. गेल्या दोन निवडणुकीत, अगदी रुबाबात, ५६ इंचांची नसलेली छाती पुढे काढून मोदी चालत होते. ते चित्र तुम्हाला आज दिसत नाहीये. मोदींचा चेहरा बघा, मोदींची बॉडी लँगुएज बघा, मोदींची भाषा बघा. पक्षामध्ये  विरोध आहे, ही माझी माहिती आहे. संघाचा विरोध आहे." एवढेच नाही तर, "मुळात नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला आहे. पराभूत झालेला माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो?" असा सवालही यावेळी राऊतांनी केला. 

मोदींनी जबरदस्तीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न  केला तरी... -राऊत पुढे म्हणाले, "तुमच्या (नरेंद्र मोदी) नेतृत्वाखाली भरतीय जनता पक्षाने निवडणूक लढली. तुमच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. पक्षाला बहुमत मिळाले नाही आणि तुम्ही कुबड्यांवर सरकार बनवून विजयाचा जल्लोष करताय? हे काय आहे? देशातील जनतेला तुम्ही मूर्ख समजता का? जर तुम्हाला खरो-खरच लोकशाहीची चाढ असेल, तर पक्षामध्ये, संसदिय पक्षामध्ये निवडणुक घ्या आणि मोदी हवे आहेत का विचारा. माझ्या माहितीनुसार, मोदींचा मार्ग सरळ नाही. मोदींनी जबरदस्तीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न  केला तरी ते सरकार टीकणार नाही. हे मी तुम्हाला आता खात्रीने सांगतोय. म्हणून राज्याराज्यात ही रडारड सुरू आहे.  मोदींना पक्षातच विरोध आहे. मोदी-शाह यांची जी दादागिरी होती, इडी, सीबीआय ती यापुढे चालणार नाही. आमच्यासारखे लोक देश आणि लोकशाहीसाठी लढायला तयार आहेत."

"माझ्या माहितीप्रमाणे संघाची टॉप लिडरशीप ही पर्यायाच्या चाचपणीसंदर्भात काम करताना दिसते आहे. कुणाला पंतप्रधान करायचे हा जरी भाजपचा प्रश्न असता, तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा बाबतीत एक भूमिका बजावत असतो. २०१४ आणि २०१९ च्या पाशवी बहूमतानंतर, मोदी आणि शाह यांनी संघालाच आपला गुलाम करण्याचा प्रयत्न केला. पण आज संघ अशा परिस्थितीत आहे की, ते एखादा निर्णय घेऊ शकतात आणि नरेंद्र मोदींना घरी पाठवू शकतात," असा दावाही यावेळी संजय राऊत यांनी केला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा