rss chief Mohan Bhagwat tests corona positive admitted to hospital | सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण; रुग्णालयात उपचार सुरू

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण; रुग्णालयात उपचार सुरू

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. शुक्रवारी त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवल्यामुळे लगेच त्यांची चाचणी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले असल्याची माहिती संघातील सूत्रांनी दिली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rss chief Mohan Bhagwat tests corona positive admitted to hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.