शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

'RSSमुळे देशात दंगली होतात, या संघटनेवर आधी बंदी घालावी', लालूंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 14:17 IST

PFIवरील कारवाईबाबत प्रश्न विचारला असता, लालू प्रसाद यादवांनी आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली: दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपानंतर केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (PFI) पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. एकीकडे बिहार भाजपच्या नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर दुसरीकडे माजी मंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी या कारवाईवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

दिल्लीत लालू प्रसाद यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना पीएफआयवरील बंदीबाबत विचारले असता ते म्हणाले की, 'जर बंदी घालायची असेल तर आधी आरएसएसवर बंदी घालावी. आरएसएस ही निरुपयोगी संघटना आहे. त्यांच्यामुळेच देशात दंगली होतात. आता देशाला एकत्र करायचे असेल, तर सर्व विरोधी पक्षांना एकत्र यावे लागेल. आम्ही सर्व एकत्र येऊ आणि हे नरेंद्र मोदींचे सरकार पाडू,' अशी प्रतिक्रिया लालूंनी दिली. 

लालू यादव 12व्यांदा राजदचे अध्यक्ष होणार लालू प्रसाद यादव यांनी आज दिल्लीत राजद अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. यावेळी राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह, लालूंच्या कन्या मीसा भारती, आमदार सुनील सिंह उपस्थित होते. लालू हे राजदच्या स्थापनेपासून राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. लालूंची आता पुन्हा एकदा बिनविरोध राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत. पक्षाध्यक्षपदाची त्यांची ही 12वी टर्म आहे. 

लालूंना परदेशात जाण्याची परवानगी मिळालीदरम्यान, बुधवारीच दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने आयआरसीटीसी घोटाळ्यातील आरोपी आरजेडी प्रमुख लालू यादव यांना उपचारासाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. लालूंच्या वतीने 10 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान उपचारासाठी सिंगापूरला जाण्यासाठी कोर्टात परवानगी मागितली होती. लालू यादव सध्या आयआरसीटीसी घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि ईडी प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाBJPभाजपा