आरएसएस आणि इसिस सारखेच - गुलाम नबी आझाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 12:42 IST2016-03-13T11:56:28+5:302016-03-13T12:42:37+5:30

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इसिस या दहशतवादी संघटनेबरोबर तुलना करुन नवीन वाद निर्माण केला आहे.

Like RSS and Isis - Ghulam Nabi Azad | आरएसएस आणि इसिस सारखेच - गुलाम नबी आझाद

आरएसएस आणि इसिस सारखेच - गुलाम नबी आझाद

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १३ - काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इसिस या दहशतवादी संघटनेबरोबर तुलना करुन नवीन वाद निर्माण केला आहे. आम्ही आरएसएसचा जसा विरोध करतो तसाच इसिसचा सुद्धा विरोध करतो. इस्लाममधील काही जण चुकीची कृत्ये करत असतील तर ते, आरएसएसपेक्षा कमी नाही असे आझाद म्हणाले. 
राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते असणा-या आझाद यांनी जमीयत उलेमा-ए-हिंदच्या मंचावरुन बोलताना आरएसएसची इसिसशी तुलना केली. आझाद यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना आरएसएस आणि भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. 
अशा विधानांमधून काँग्रेसची बौद्धिक दिवाळखोरी दिसून येते अशी बोचरी टीका नागपूरमधील आरएसएसच्या प्रवक्त्याने केली. आझाद यांच्या या विधानावर आरएसएसकडून कायदेशीर कारवाई करण्याचा विचारही सुरु आहे. 
 

Web Title: Like RSS and Isis - Ghulam Nabi Azad