RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 16:56 IST2025-11-09T16:56:05+5:302025-11-09T16:56:41+5:30
RSS 100 Years : या वेळी, “RSS मध्ये मुस्लीमांना सहभागी होण्याची परवानगी आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर भागवत असे उत्तर दिले की, संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने देशभरात शताब्दी वर्ष साजरे करण्या येत आहे. विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. बेंगलोर येथे अशाच एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी हजेरी लावली. या वेळी, “RSS मध्ये मुस्लीमांना सहभागी होण्याची परवानगी आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर भागवत असे उत्तर दिले की, संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
भागवत म्हणाले, “संघात कुठल्याही ब्राह्मणाला परवाणगी नाही अथवा इतर कुठल्या जातीलाही परवाणगी नाही. त्याचप्रमाणे, मुस्लीम किंवा ख्रिश्चनालाही परवानगी नाही. संघात केवळ ‘हिंदू’ला परवानगी आहे. यामुळे, कोणत्याही पंथातील लोक, मुस्लीम, ख्रिश्चन अथवा आणखी कुठल्याही पंथातील लोक संघात येऊ शकतात, मात्र त्यांची वेगळी ओळख बाहेर ठेऊन.”
ते पुढे म्हणाले, “आपली वैशिष्ट्ये स्वागतार्ह आहेत, परंतु शाखेत येताना आपण भारतमातेचे पुत्र आणि या हिंदू समाजाचे सदस्य म्हणूनच येता. यामुळे, मुस्लीम शाखेत येतात, ख्रिश्चनही येतात, जसे की हिंदू समाजातील इतर जातींचे लोक येतात. मात्र, आम्ही त्यांची संख्या नोंदवत नाही आणि कोण आहे हे विचारतही नाही."
#WATCH | Bengaluru | On being asked are Muslims allowed in RSS?, RSS Chief Mohan Bhagwat says, "No Brahmin is allowed in Sangha. No other caste is allowed in Sangha. No Muslim is allowed, no Christian is allowed in the Sangha... Only Hindus are allowed. So people with different… https://t.co/CbBHvT9H7npic.twitter.com/WJNjYWPMSq
— ANI (@ANI) November 9, 2025
याच बरोबर, "आपण सर्वजण भारत मातेचे पुत्र आहोत. अशा पद्धतीने संघ काम करतो," असेही भागवत म्हणाले.