तामिळनाडूला ९४० कोटी रुपयांची मदत
By Admin | Updated: November 24, 2015 03:36 IST2015-11-23T23:53:19+5:302015-11-24T03:36:08+5:30
तामिळनाडूतील मुसळधार पाऊस आणि पुरामुळे उत्पन्न स्थितीशी निपटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यास सुमारे ९४० कोटी रुपयांची आर्थिक मदत तात्काळ जारी करण्याचे निर्देश दिले.

तामिळनाडूला ९४० कोटी रुपयांची मदत
नवी दिल्ली : तामिळनाडूतील मुसळधार पाऊस आणि पुरामुळे उत्पन्न स्थितीशी निपटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यास सुमारे ९४० कोटी रुपयांची आर्थिक मदत तात्काळ जारी करण्याचे निर्देश दिले. पंतप्रधानांनी हे निर्देश जारी करण्याच्या काही तास आधी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी त्यांना पत्र लिहून आर्थिक मदतीची मागणी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूरप्रभावित तामिळनाडूला तात्काळ ९३९.६३ कोटी रुपयांची आर्थिक मदत जारी करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती एका पत्रकाद्वारे सोमवारी देण्यात आली. पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक तामिळनाडूकडे रवाना केले जात आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)