शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 17:36 IST

नितीन गडकरी यांनी सहा महिन्यांपूर्वी हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे, खरहाल व्हॅलीमध्ये बिजली महादेव रोपवेची घोषणा केली होती...

हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातील भाजप खासदार कंगना रणौत आता केंद्र सरकारच्याच एका प्रोजेक्ट विरोधात मैदानात उतरल्या आहेत. नितीन गडकरी यांनी सहा महिन्यांपूर्वी हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे, खरहाल व्हॅलीमध्ये बिजली महादेव रोपवेची घोषणा केली होती. मात्र आता कंगना राणौत यांनी 272 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

स्थानिक लोकांकडून प्रोजेक्टला विरोध -बिजली महादेव मंदिराच्या रोपवेसंदर्भात खराहल आणि कशावरी खोऱ्यातील लोक अनेक दिवसांपासून विरोध करत आहेत. बिजली महादेव रोपवेच्या विरोधात ग्रामस्थांनी अनेकवेळा रस्त्यावर उतरून आंदोलनही केले आहे. रोपवेमुळे देवता खूश नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच, रोपवे बांधल्यामुळे आपल्या रोजगारावर मोठा परिणाम होणार आहे. याशिवाय, रोप वेसाठी अनेक झाडे कापली जाणार असल्याने पर्यावरणाचीही हानी होणार असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

काय म्हणाल्या कंगना रणौत -या प्रकल्पासंदर्बात आपण नितीन गडकरी यांची भेट घेतली असून त्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. आमच्या देवाची इच्छा नसेल तर येथे हा प्रोजेक्ट बंद व्हायला हवा. मी पुन्हा नितीन गडकरी यांची भेट घेईल. आपल्यासाटी आपल्या देवतेचा आदेश आधुनिकीकरणाहूनही अधिक महत्वाचा आहे, असे कंगना राणौत यांनी म्हटले आहे. 

नितिन गडकरी यांनी केले होते भूमिपूजन-  हिमाचलमधील कुल्लू येथील मोहल नॅचर पार्कमध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते बिजली महादेव रोपवेचे व्हर्च्युअली भूमिपूजन करण्यात आले होते. या रोप वेचे काम दीड वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. हा रोप वे तयार झाल्यानंतर 36000 पर्यटक एका दिवसात बिजली महादेवला पोहोचतील आणि यथील पर्यटनालाही मोठी चालना मिळेल.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतNitin Gadkariनितीन गडकरीHimachal Pradeshहिमाचल प्रदेशBJPभाजपा