शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

लसीची २५० रुपये किंमत ही लसउत्पादक कंपन्यांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 05:00 IST

बायकॉनच्या अध्यक्ष किरण मजुमदार शॉ यांची टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारने खासगी रुग्णालये व आरोग्य केंद्रे येथे कोरोना लसीची किंमत २५० रुपये ठेवली आहे. ही किंमत इतकी कमी आहे की ते लसनिर्मिती कंपन्यांना परवडणारे नाही. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे लस कंपन्यांना स्वत:ची फसवणूक झाल्यासारखे वाटत आहे, अशी टीका बायकॉन या कंपनीच्या अध्यक्ष किरण मजुमदार शॉ यांनी केली आहे. 

त्या म्हणाल्या की, केंद्र सरकार लसनिर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याऐवजी त्याचे खच्चीकरण करत आहे. २५० रुपयांना कोरोना लस दिली, तर संबंधित लसनिर्मिती कंपनी फार काळ तग धरू शकणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लसीची किंमत तीन डॉलरपर्यंत ठेवली आहे. मात्र भारताने त्याहीपेक्षा कमी म्हणजे फक्त दोन डॉलर इतकीच किंमत ठेवली आहे असेही किरण मजुमदार शॉ यांनी सांगितले. 

तीव्र नाराजीचा सूरकोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिक व एकाहून अधिक व्याधीने ग्रस्त असलेल्या ४५ वर्षांवरील वयाच्या लोकांना १ मार्चपासून कोरोना लस देण्यास सुरुवात झाली आहे. अशा महत्त्वाच्या टप्प्यावर केंद्र सरकारने कोरोना लसीची किंमत खासगी रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये २५० रुपये ठेवण्याचा निर्णय घेतल्याने देशातील लसउत्पादक कंपन्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्याला बायकॉनच्या चेअरमन किरण मजुमदार शॉ यांनी वाचा फोडली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस