शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

'अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 09:16 IST

ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आली आहे.

बहराइच - काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर हे गुजरातमध्येउत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांना मारहाण करुन त्यांना तेथून पळवून लावल्या प्रकरणी चर्चेत आले होते. उत्तर प्रदेशमध्ये ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटीचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराणी पद्मावती युथ ब्रिगेड’ संघटनेने यासंदर्भातील पोस्टर्स जिल्ह्यात ठिकठिकाणी लावले आहेत. पोलिसांनी हे पोस्टर्स हटवून समाजात असंतोष पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

अल्पेश ठाकोर आणि त्यांचे कार्यकर्ते हे राक्षसी प्रवृत्तीचे असून ते गरीब कामगारांना मारहाण करतात. हे लोक देश तोडण्याचे काम करीत आहेत. त्यांच्याविरोधात सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं  ‘महाराणी पद्मावती युथ ब्रिगेड’चे राष्ट्रीय अध्यक्ष भवानी ठाकूर यांनी सांगितलं. तसेच ठाकोरचा शिरच्छेद करणाऱ्यांला आम्ही एक कोटीचे बक्षीस जाहीर केले असून त्यासंदर्भात जागोजागी पोस्टर्स लावले आहेत. जर ठाकोर गुजरात सोडून बाहेर जाणार नसतील तर आम्ही गुजरातमध्ये घुसून त्यांचे शिरच्छेद करू असे ठाकूर यांनी म्हटलं आहे. 

अप्पर पोलीस अधीक्षक अजय प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर बहराइचमध्ये अशा प्रकारचे पोस्टर्स लावण्यात आले. त्यानंतर हे पोस्टर्स जोरदार व्हायरल झाले असून हे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले आहे. तसेच समाजात असंतोष पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. पोस्टर्स हटवण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले असून पोस्टर्स लावणाऱ्यांची चौकशी करणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Alpesh Thakorअल्पेश ठाकुरcongressकाँग्रेसGujaratगुजरातUttar Pradeshउत्तर प्रदेश