'या' राज्याच्या विधानसभेत नमाजसाठी देण्यात आली रूम; भाजपनं केली हनुमान मंदिर बांधण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 04:43 PM2021-09-04T16:43:12+5:302021-09-04T16:45:12+5:30

यावर बोलताना माजी सभापती आणि भाजप नेते सीपी सिंह म्हणाले, मी नमाज पठणासाठी दिलेल्या रूमच्या विरोधात नाही, पण त्यांनी झारखंड विधानसभा परिसरात मंदिरही बांधायला हवे. मी तर अशीही मागणी करतो, की तेथे हनुमान मंदिर बांधायला हवे.

Room allotted for offering namaz in new assembly building in Jharkhand bjp said hanuman temple should also be built | 'या' राज्याच्या विधानसभेत नमाजसाठी देण्यात आली रूम; भाजपनं केली हनुमान मंदिर बांधण्याची मागणी

'या' राज्याच्या विधानसभेत नमाजसाठी देण्यात आली रूम; भाजपनं केली हनुमान मंदिर बांधण्याची मागणी

googlenewsNext

झारखंडच्या नवीन विधानसभा इमारतीत नमाज पठणासाठी एक स्वतंत्र रूम देण्यात आली आहे. आता यावरून वाद निर्माण झाला आहे. विधानसभा सचिवालयाने जारी केलेल्या आदेशात, म्हणण्यात आले आहे, की नवीन विधानसभा इमारतीत नमाज पठणासाठी रूम नंबर TW-348 देण्यात आली आहे. 2 सप्टेंबर रोजी जारी झालेला हा आदेश समोर येताच, आता वाद सुरू झाला आहे. जर नमाजसाठी रूम दिली गेली असेल, तर त्यात हनुमानजींचे मंदिरही बांधण्यात यायला हवे, अशी मागणी भाजपने केली आहे. (Room allotted for offering namaz in new assembly building in Jharkhand bjp said hanuman temple should also be built)

यावर बोलताना माजी सभापती आणि भाजप नेते सीपी सिंह म्हणाले, मी नमाज पठणासाठी दिलेल्या रूमच्या विरोधात नाही, पण त्यांनी झारखंड विधानसभा परिसरात मंदिरही बांधायला हवे. मी तर अशीही मागणी करतो, की तेथे हनुमान मंदिर बांधायला हवे. जर सभापतींनी मंजुरी दिली, तर आम्ही स्वखर्चाने मंदिर बांधू शकतो. याशिवाय, लोकशाहीचे मंदिर हे लोकशाहीचे मंदिरच असायला हवे,असे भाजप नेते बाबूलाल मरांडी यांनी म्हटले आहे. नमाजसाठी स्वतंत्र रूम देणे चुकीचे आहे. आम्ही या निर्णयाविरोधात आहोत.

भाजपचे आमदार अनंत ओझा यांनी ट्विट करून यावर प्रश्न उपस्थित केला आहे, की हे काय सभापती महोदय, आता राज्यातील सर्वात मोठी पंचायतही तुष्टीकरणाला खत-पाणी घालण्याच्या मार्गावर? झारखंड विधानसभेत नमाज पठणासाठी स्वतंत्र रूम. झारखंडचे लोक सर्व पाहत आहेत. सर्वधर्म संभावाच्या मूळ आत्म्याला कलंकित करण्याचा निर्णय. 

दुसरीकडे, झारखंड भाजपचे प्रवक्ता प्रतुल शाह देव यांनी म्हटले आहे, की सर्व बाजूंनी अपयश आले, की लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करा. झारखंडच्या इतिहासात प्रथमच विधानसभा भवनमध्ये नमाज पठणासाठी नमाज भवन बांधण्यात आले. तुष्टीकरणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. विधानसभेत बहुसंख्य समाजासाठी मंदिर किंवा प्रार्थना सभागृहाची तरतूद आहे का?
 

Web Title: Room allotted for offering namaz in new assembly building in Jharkhand bjp said hanuman temple should also be built

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.