शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:40 IST

मध्यरात्री प्रेयसीला भेटायला गेलेल्या या प्रियकराला गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर जे काही घडले, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!

झारखंडच्या साहिबगंजमध्ये एका युवकाला चार मुलांच्या आईसोबत प्रेमसंबंध ठेवणे चांगलेच महागात पडले आहे. मध्यरात्री प्रेयसीला भेटायला गेलेल्या या प्रियकराला गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर जे काही घडले, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!

मध्यरात्रीचा 'रोमान्स' आणि गावकऱ्यांचा छापाही घटना बोरियों पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बास्को गावातील आहे. सोमवारी रात्री उशिरा गावातील एका ३० वर्षीय विवाहित महिलेला आणि एका २२ वर्षीय युवकाला आक्षेपार्ह अवस्थेत गावकऱ्यांनी पाहिले. महिला या गावतीलच आहे, तर युवक उमेश सिंह हा जवळच्या वनगावा येथील टेम्पो चालक आहे.

दोरखंडाने बांधले, मारहाण केली आणि...गावकऱ्यांनी दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर ते पळून जाऊ नये म्हणून दोरीने बांधून ठेवले. इतकेच नव्हे, तर त्यांना बेदम मारहाणही केली. प्रियकर उमेश सिंह याला इतके मारले की, तो बेशुद्ध झाला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

पंचायतीने ठोठावला अजब दंड!मध्यरात्री घडलेला या घटनेनंतर सकाळ झाली आणि गावात पंचायत बसली. पंचायतीने त्वरित निर्णय देत प्रेमी युगुलाला ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला. ही दंडाची संपूर्ण रक्कम तरुणालाच भरावी लागणार आहे.

पोलिसांची एन्ट्री आणि सुटकायादरम्यान, सुदैवाने कोणीतरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि गावकऱ्यांच्या तावडीतून दोघांची सुटका केली. त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

महिलेच्या पतीने पोलिसांना सांगितले की, त्याला या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा आधीपासूनच संशय होता. एसडीपीओ किशोर तिर्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अद्याप कोणत्याही पक्षाने पोलिसांत लेखी तक्रार दिलेली नाही. मात्र, पोलीस आपल्या स्तरावर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :Jharkhandझारखंडhusband and wifeपती- जोडीदारCrime Newsगुन्हेगारी