रोहित हा दलितच होता - पी. एल. पुनिया

By Admin | Updated: February 1, 2016 17:21 IST2016-02-01T17:21:45+5:302016-02-01T17:21:45+5:30

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा दावा खोडताना श्येड्युल्ड कास्ट कमिशनचे अध्यक्ष पी. एल. पुनिया यांनी रोहित वेमुला हा दलित होता असे म्हटले आहे

Rohit was a Dalit - P. L. Punia | रोहित हा दलितच होता - पी. एल. पुनिया

रोहित हा दलितच होता - पी. एल. पुनिया

>ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. १ - परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा दावा खोडताना श्येड्युल्ड कास्ट कमिशनचे अध्यक्ष पी. एल. पुनिया यांनी रोहित वेमुला हा दलित होता असे म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना पुनिया म्हणाले की रोहित मागास जातीचा सदस्य होता. काही जण हा विषय संपवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्या जातीविषयी संभ्रम निर्माण करत आहेत, असं पुनिया म्हणाले.
रोहित व त्याच्या भावंडांना त्याच्या आईने वाढवले. जो पिता अनेक वर्षांपूर्वी कुटुंबाला सोडून निघून गेला त्याच्यावरून मुलांची जात कशी ठरवणार असा प्रश्न पुनिया यांनी उपस्थित केला आहे. रोहितची आई दलित होती, त्यामुळे रोहित व त्याची भावंडेही दलित असल्याचे पुनिया यांनी म्हटले आहे. मी हैदराबाद विद्यापीठाच्या अधिका-यांना भेटलो आहे, तसेच रोहितबरोबर निलंबित करण्यात आलेल्या त्याच्या मित्रांनाही भेटलो आहे असे सांगत रोहित दलित होता यावर माझा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी राहूल गांधींनी दाखवलेल्या पाठिंब्यासाठी पुनिया यांनी त्यांचे आभार मानसे आहेत. 

Web Title: Rohit was a Dalit - P. L. Punia