शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

जय शहांसोबत पाहिली मॅच, सचिनशीही संवाद; रोहित पवारांचा असा 'हा' अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 14:35 IST

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा सर्वात मोठा विजय झाला

अहमदाबाद/मुंबई - भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दणदणीत विजयाची नोंद करताना मालिका २-१ अशी जिंकली. शुभमन गिलचे ( Shubman Gill) विक्रमी शतक आजच्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. शुभमनने आजच्या या नाबाद १२६ धावांच्या खेळीने मोठमोठे विक्रम मोडले. त्याच्या फटकेबाजीनंतर भारतीय जलदगती गोलंदाजांनी कमाल केली. त्यात सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) टिपलेले तीन भन्नाट झेल, सामन्याला कलाटणी देण्यासाठी पुरेसे ठरले. षटकारांची आतषबाजी करणारा हा सामना डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. अहमदाबादमध्ये हा सामना पाहण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार हेही उपस्थित होते. 

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा सर्वात मोठा विजय झाला. त्यामुळे, टीम इंडियाचं सर्वत्र कौतुक होत आहे. हा सामना कोट्यवधी भारतीय घरी बसून पाहत होते, तसेच अहमदाबादच्या स्टेडियमवरही मोठी गर्दी होती. या गर्दीत राजकीय नेत्यांचाही समावेश होते. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेही या सामन्याला उपस्थित होते. तसेच, बीसीबीआयचे सचिव जय शहा आणि खजिनदार व भाजप नेते आशिष शेलार हेही सामना पाहण्यासाठी होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही या नेत्यांसमेवत विशेष गॅलरीत बसून या सामन्याचा आनंद घेतला. स्वत: पवार यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, BCCI चे सचिव जय शहा आणि खजिनदार आशिष शेलार यांच्यासमवेत अहमदाबादमध्ये भारत-न्युझीलंड मॅच बघण्याचा आज योग आला. यावेळी भारताच्या विजयाने आणि स्टार फलंदाज शुबमन गिलच्या शानदार सेंच्युरीने मॅचची रंगत अधिकच वाढली, असे ट्विट रोहित यांनी केले आहे. त्यासोबतच, या सामन्यादरम्यान, रोहित यांनी सचिन तेंडुलकरचीही भेट घेतली. या भेटीचेही फोटो त्यांनी शेअर केले आहेत. 

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकरRohit Pawarरोहित पवारTeam Indiaभारतीय क्रिकेट संघahmedabadअहमदाबाद