काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ब्रिटनमधील शस्त्रास्त्र विक्रेता संजय भंडारी यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने वाड्रा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. न्यायालय आता ६ डिसेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.
ईडीचा तपास लंडनच्या तीन पत्त्यांवर केंद्रित व्यवहार आणि मालमत्तांशी संबंधित आहे. १९ ब्रायनस्टन स्क्वेअर, ग्रोसव्हेनॉर हिल कोर्ट आणि १३ बॉर्डन स्ट्रीट. या मालमत्ता संजय भंडारी यांच्या मालकीच्या असल्याचे सांगितले जाते, परंतु ईडीचा आरोप आहे की त्या प्रत्यक्षात वड्रा यांच्या बेनामी मालमत्ता आहेत.
जुलैमध्ये, याच प्रकरणासंदर्भात एजन्सीने रॉबर्ट वाड्रा यांची सुमारे पाच तास चौकशी केली. या मालमत्तांच्या खरेदी आणि व्यवहारात कथित मनी लाँडरिंगचे पुरावे सापडल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.
आरोपपत्र दाखल झाल्यानंतर, खटला न्यायालयात पुढील टप्प्यात प्रवेश करेल, पुढील कार्यवाहीचा निर्णय ६ डिसेंबर रोजी घेतला जाईल.
Web Summary : Robert Vadra faces intensified scrutiny as the ED filed a chargesheet in a money laundering case linked to arms dealer Sanjay Bhandari. The case involves London properties allegedly owned by Vadra. The court will hear the case on December 6th.
Web Summary : रॉबर्ट वाड्रा की मुश्किलें बढ़ गई हैं क्योंकि ईडी ने हथियार डीलर संजय भंडारी से जुड़े मनी लॉन्ड्रिंग मामले में आरोप पत्र दाखिल किया है। मामले में लंदन की संपत्तियां शामिल हैं जो कथित तौर पर वाड्रा के स्वामित्व में हैं। कोर्ट 6 दिसंबर को मामले की सुनवाई करेगा।