दरोडेखोरांची स्कोर्पिओ पारोळ्याला सापडली

By Admin | Updated: December 13, 2015 00:07 IST2015-12-13T00:07:35+5:302015-12-13T00:07:35+5:30

सटाणा : संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणार्या सटाण्यातील गोळीबार प्रकरणातील दरोडेखोरांनी गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे बेवारस स्थितीत आढळून आल्याची माहिती मालेगाव ग्रामीण चे पोलीस उपाधीक्षक अशोक नखाते यांनी दिली आहे.काल मध्यरात्री 2.30 च्या सुमारास सटाणा येथील आहिरराव ज्वेलर्स या दुकानात दरोड्याचा प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांना किरण तुळशीराम सोनवणे यांनी हटकले असता त्यांच्यावर बंदुकीच्या दोन गोळ्या फायर करून दरोडेखोर पसार झाले आहेत.या घटनेने सर्वत्र खळबळ उडालेली असतांना या गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ धुळे-जळगाव मार्गावर पारोळयानजीक बेवारस स्थितीत आढळून आली आहे.पारोळा पोलिसांनी मागील बाजूचा काच फुटलेली स्कॉर्पिओ ताब्यात घेतली असून त्या स्कॉर्पिओचा क्र मांक एम एच 06 एबी 9543असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान या गंभीर गुन्ह्यात वा

The robbers found scorpio parola in Scorpio | दरोडेखोरांची स्कोर्पिओ पारोळ्याला सापडली

दरोडेखोरांची स्कोर्पिओ पारोळ्याला सापडली

ाणा : संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणार्या सटाण्यातील गोळीबार प्रकरणातील दरोडेखोरांनी गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे बेवारस स्थितीत आढळून आल्याची माहिती मालेगाव ग्रामीण चे पोलीस उपाधीक्षक अशोक नखाते यांनी दिली आहे.काल मध्यरात्री 2.30 च्या सुमारास सटाणा येथील आहिरराव ज्वेलर्स या दुकानात दरोड्याचा प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांना किरण तुळशीराम सोनवणे यांनी हटकले असता त्यांच्यावर बंदुकीच्या दोन गोळ्या फायर करून दरोडेखोर पसार झाले आहेत.या घटनेने सर्वत्र खळबळ उडालेली असतांना या गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ धुळे-जळगाव मार्गावर पारोळयानजीक बेवारस स्थितीत आढळून आली आहे.पारोळा पोलिसांनी मागील बाजूचा काच फुटलेली स्कॉर्पिओ ताब्यात घेतली असून त्या स्कॉर्पिओचा क्र मांक एम एच 06 एबी 9543असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान या गंभीर गुन्ह्यात वापरलेली ती स्कॉर्पिओ पनवेल येथून काही दिवसांपूर्वी चोरी झाली असल्याची माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. (वार्ताहर )

Web Title: The robbers found scorpio parola in Scorpio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.