रस्त्याचे काम कागदावरच, मात्र पैसे मक्तेदारांच्या खिशात
By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30
नाशिक : निफाड तालुक्यातील दोन रस्त्यांची कामे कागदावरच पूर्ण करून मक्तेदारांनी कामांची पहिल्या टप्प्यातील रक्कमही काढून घेतल्याचा प्रकार माजी जिल्हा परिषद सदस्य राजाराम शेलार यांनी काल मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या निदर्शनास आणून दिला.

रस्त्याचे काम कागदावरच, मात्र पैसे मक्तेदारांच्या खिशात
न शिक : निफाड तालुक्यातील दोन रस्त्यांची कामे कागदावरच पूर्ण करून मक्तेदारांनी कामांची पहिल्या टप्प्यातील रक्कमही काढून घेतल्याचा प्रकार माजी जिल्हा परिषद सदस्य राजाराम शेलार यांनी काल मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या निदर्शनास आणून दिला.जिल्हा नियोजन मंडळाकडून निफाड पंचायत समितीस बिगर आदिवासी भागातील रस्त्यांची कामे व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यातीलच या दोन रस्त्यांच्या कामांबाबत राजाराम शेलार यांनी सुखदेव बनकर यांच्याकडे तक्र्रार केली. त्यानंतर सुखदेव बनकर यांनी बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याना या दोन्ही रस्त्यांची कामे झाली आहेत काय? आपण त्या रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्यासाठी येणार असून, रस्ते झालेले नसल्यास संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात येईल,असा इशारा दिला. निफाड ग्रामपंचायतीअंतर्गत नाशिक - औरंगाबाद महामार्ग ते जुने शिवरे वस्ती या सुमारे दोन किलोमीटर वस्तीचा रस्ता व शेलार वस्ती ते कापसे वस्ती हा अर्धा किलोमीटरचा रस्ता अशा दोन रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, या दोन्ही रस्त्यांच्या कामांची पहिल्या टप्प्यातील देयकेही काढण्यात आल्याचे समजते. या रस्त्याच्या कामावर एक पाटीसुद्धा मुरूम आणि खडी पडलेली नसताना प्रत्यक्षात बिले कशी काढली गेली? असा आरोप राजाराम शेलार यांनी केला आहे. सुखदेव बनकर यांनी बांधकाम विभागाच्या संबंधित उपअभियंत्याला याबाबत तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.(प्रतिनिधी)