देशात रस्ते बांधणी विक्रमी वेळेत; १ लाख ३१,१९० किमीचे रस्ते तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 06:35 AM2022-04-15T06:35:18+5:302022-04-15T06:35:34+5:30

३१ मार्चपर्यंत तब्बल १ लाख ४१ हजार १९० किमीचे बांधकाम पूर्ण केले आहे.

Road construction in the country in record time 1 lakh 31190 km of roads completed | देशात रस्ते बांधणी विक्रमी वेळेत; १ लाख ३१,१९० किमीचे रस्ते तयार

देशात रस्ते बांधणी विक्रमी वेळेत; १ लाख ३१,१९० किमीचे रस्ते तयार

Next

नवी दिल्ली :

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २०२४-२५ पर्यंत राष्ट्रीय महामार्ग बांधणीच्या दोन लाख किमीच्या उद्दिष्टापैकी यावर्षी ३१ मार्चपर्यंत तब्बल १ लाख ४१ हजार १९० किमीचे बांधकाम पूर्ण केले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली.

पेट्रोलियम मंत्रालयाने याच कालावधीत २० हजार किलोमीटरपर्यंतची गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण केले आहे. २०२४-२५ पर्यंत ३४ हजार ५०० किमीपर्यंतची गॅस पाइपलाइन टाकण्याचे लक्ष्य आहे, तर ऊर्जा मंत्रालयाने मार्च २०२२ अखेर ४,५४,२०० किमीचे पारेषण नेटवर्क तयार करण्याचे उद्दिष्ट पूर्ण आहे. दूरसंचार विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षांसाठी ५० लाख किमीचे लक्ष्य ठेवले असून, यातील ३३ लाख ९९७ किमीचे ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्क पूर्ण झाले  आहे. 

हे विभाग आघाडीवर
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय,  पेट्रोलियम मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय, दूरसंचार विभाग

Web Title: Road construction in the country in record time 1 lakh 31190 km of roads completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.