शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

भाजपाला जिंकून देण्यासाठी राजस्थान; एनडीएमध्ये दाखल झाले 'हनुमान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 16:54 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असतानाच राजस्थानमध्ये भाजपाला तगडा सहकारी लाभला आहे.

नवी दिल्ली -  गतवर्षांच्या अखेरीस राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजस्थानमधील पैकीच्या पैकी जागा जिंकणाऱ्या भाजपाच्या गोटात खळबळ उडाली होती. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असतानाच राजस्थानमध्ये भाजपाला तगडा सहकारी लाभला आहे. राजस्थानमधील मारवाड भागात प्रभाव असणाऱ्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे प्रमुख हनुमान बेनिवाल यांनी एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भाजपानेही त्यांना नागौर मतदारसंघातून उमेदवारी दिली असून, बेनिवाल यांचा एनडीएमधील प्रवेश हा काँग्रेससाठी धक्का असल्याचे म्हटले जात आहे.  एनडीएमध्ये दाखल झालेले बेनिवाल म्हणाले की, ''आमच्यासाठी राष्ट्रहित सर्वोच्च आहे. भाजपाने नागौर मतदारसंघ आरएलपीसाठी सोडला आहे. आता राजस्थानमधील 24 जागांसोबतच हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये आरएलपीचे कार्यकर्ते मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी आपली शक्ती पणाला लावतील. सत्तेत असताना काँग्रेसने देशाला लुटण्याचे कामच केले आहे. आता राजस्थानमध्येही 25-0 असा निकाल लागेल.काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही.'' 

यावेळी भाजपाचे राजस्थान प्रभारी प्रकाश जावडेकर आणि प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांनी बेनिवाल यांच्या पक्षासोबत आघाडी झाल्याने समाधाम व्यक्त केले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना हनुमान बेनिवाल म्हणाले की,''देशहित विचारात घेऊन आम्ही एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये तिसऱ्या मोर्चाचे अस्तित्व दिसून येत नाही. मी सुरुवातीपासूनच भाजपामध्ये होतो. आजच्या घडीला जर कुणी पाकिस्तान आणि चीनला धाकात ठेवू शकत असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच  आहेत.''  आरएलपीचे प्रमुख हनुमान बेनिवाल हे खिंवसर मतदारसंघातून आमदार असून, ते या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून सातत्याने निवडून येत आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाची स्थापना केली होती. मात्र बेनिवाल हे एनडीएमध्ये आले असले तरी त्यांचे भाजपा नेत्या वसुंधरा राजेंशी फार पटत नाही. ही बाब भाजपासाठी चिंतेची आहे. दरम्यान, हनुमान बेनिवाल एनडीएमध्ये आल्याने जाट मतदारांवर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Rajasthan Lok Sabha Election 2019राजस्थान लोकसभा निवडणूक 2019nagaur-pcनागौरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारणRajasthanराजस्थान