शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

Rabri Devi : "२ दिवसांत २२ हत्या, हे मंगलराज आहे का?"; बिहारमधील गुन्हेगारीवर राबडी देवींचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 17:49 IST

Rabri Devi : कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरुन माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी नितीश कुमार यांना घेरलं.

बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरुन माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी नितीश कुमार यांना घेरलं. राज्यातील वाढत्या गुन्हेगारी आणि पोलिसांवरील हल्ल्यांवरून जोरदार निशाणा साधला. "नितीश म्हणतात की, हे सुशासनाचं सरकार आहे. कुठे आहे सुशासन? बिहारमध्ये होळी दरम्यान दोन दिवसांत २२ हत्या झाल्या आहेत. इतके पोलीस यापूर्वी कधीही मारले गेले नव्हते."

"बहिणी आणि मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केली जाते. इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल मारले जात आहेत. मग सामान्य लोकांचं काय होईल? सुरक्षा पुरवणाऱ्यांची हत्या केली जात आहे. हेच मंगलराज आहे का? जंगलराज म्हणतात, जंगलराजमध्ये इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल मरत नव्हते" असं म्हणत राबडी देवी यांनी टीका केली आहे.

आरजेडीचे आमदार आणि मुख्य सरचिटणीस रणविजय साहू यांनी बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. तेजस्वी यांचं सरकार येताच एन्काउंटर पॉलिसी लागू केली जाईल. बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. नितीश कुमार गृहखाते सांभाळू शकत नाहीत. पोलिसांचे खून होत आहेत. दगडफेक होत आहेत. सामान्य लोक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत असं म्हटलं आहे. 

बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीवरून विरोधी पक्ष सरकारला सभागृहापासून रस्त्यांपर्यंत  प्रत्येक मुद्द्यावर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणुकीमुळे विरोधी पक्ष हा मुद्दा सहजासहजी सोडत नाही. सत्तेत असलेले लोक जंगलराजची आठवण करून देण्याशिवाय दुसरं कोणतेही उत्तर देऊ शकत नाहीत. गेल्या एका आठवड्यात पोलिसांवरील सततचे हल्ले रोखणं ही सरकारसाठी एक मोठी जबाबदारी आहे. मात्र सरकारच्या काही मंत्र्यांनी म्हटलं आहे की, हे सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधकांचं षड्यंत्र आहे. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीNitish Kumarनितीश कुमारPoliticsराजकारणPoliceपोलिस