शहरं
Join us  
Trending Stories
1
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
2
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
4
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
5
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
6
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
7
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
8
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
9
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
10
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
11
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
12
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
13
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
14
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
15
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
16
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
17
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
18
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
19
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
20
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना हृदयविकाराचा त्रास; मुंबईच्या रुग्णालयात अँजिओप्लास्टी केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 19:25 IST

आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दोन दिवसांपूर्वी पाटणाहून मुंबईत रुग्णालयात दाखल केले आहे. आज बुधवारी त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली.

बिहारचे माजी मुख्यमंत्री आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव मुंबईतील रुग्णालयात दाखल झाले आहेत, त्यांच्यावर आज बुधवारी अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. हृदयविकाराच्या समस्येमुळे अँजिओप्लास्टी करण्यात आली. ७६ वर्षीय लालू प्रसाद यादव यांना दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले होते. ब्लॉकेजमुळे डॉक्टरांनी अँजिओप्लास्टीचा सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे. 

भ्रष्टाचार की महागाई म्हणावे...! ७ वर्षांपूर्वी ४२ कोटींना उड्डाणपूल बांधला, आता तोडायला ५२ कोटी खर्च

अँजिओप्लास्टीनंतर लालू प्रसाद यादव यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. एक-दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमधील डॉक्टरांनी त्यांची अँजिओप्लास्टी यशस्वी झाल्याची माहिती दिली.  लालू प्रसाद यादव गेल्या मंगळवारी पाटणाहून मुंबईत पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, ते नियमित आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांना भेटणार आहेत.

लालू प्रसाद यादव यांचे १० वर्षांपूर्वी याच रुग्णालयात हृदयाचे ऑपरेशन झाले होते. ही शस्त्रक्रिया सुमारे ६ तास चालली होती. यानंतर लालू प्रसाद यादव २०१८ आणि २०२३ मध्ये चेकअपसाठी दोनदा मुंबईला आले होते.

लालू प्रसाद यादव गेल्या काही वर्षांपासून आजाराने त्रस्त आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यारोपण करण्यात आली. त्यानंतर ते अनेक महिने घरीच आराम करत आहेत.  

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवhospitalहॉस्पिटल