कोरोनादरम्यान राजधानी दिल्लीत वाढला व्हायरल फीवरचा धोका, हॉस्पिटलमध्ये लागल्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 18:42 IST2021-08-10T18:42:33+5:302021-08-10T18:42:44+5:30
Viral Fever in Delhi: कोरोना आणि व्हायरल फीवरची काही लक्षणे सारखी असल्यामुळे नागरिकांमध्ये कंफ्यूजन वाढले आहे.

कोरोनादरम्यान राजधानी दिल्लीत वाढला व्हायरल फीवरचा धोका, हॉस्पिटलमध्ये लागल्या रांगा
नवी दिल्ली: देशातील इतर राज्यांसह दिल्लीमध्येही कोरोना(corona) रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पण, कोरोनानंतर आता राजधानीत व्हायरल फीवर(Viral Fever)ने सर्वांचीच धाकधूक वाढवलीये. मागील काही दिवसांपासून दिल्ली-एनसीआरमध्ये होत असलेल्या पावसामुळे शेकडो लोकांमध्ये डेंगू, मलेरिया आणि टायफाइडची लक्षण आढळली आहेत. ही लक्षणे असलेली अनेक रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती होत आहेत.
पावसाने चिंता वाढवली
दिल्ली आणि आसपासच्या परिसरात मागील एका महिन्यापासून थोड्या किंवा जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलंय आणि या पाण्यामुळे डासांची पैदासही वाढली आहे. या डासांमुळेच दिल्लीत डेंगूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. एक रिपोर्टनुसार, एकट्या दिल्लीत 1 जानेवारी ते 7 ऑगस्टदरम्यान डेंगूच्या रुग्णांची संख्या 2018 नंतर सर्वाधिक आहे. या काळात 2018 मध्ये फक्त 64 रुग्ण आढळले होते, पण यंदा ही संख्या चांगलीच वाढली आहे.
कोरोना आणि व्हायरल फीवरमध्ये कंफ्यूजन
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, कोरोना आणि व्हायरल फीवरची काही लक्षणे सारखी असल्यामुळे दोन्हीमध्ये खूप कंफ्यूजन होत आहे. व्हायरल फीवर असलेली रुग्णही कोरोनाच्या भीतीने हॉस्पिटलमध्ये जात आहेत, पण टेस्टिंगनंतर फीवर असल्याचे समोर येत आहे. पावसाच्या वातावरणात व्हायरल फीवर पसरत असतो, त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नसल्याचं डॉक्टरांचं म्हणण आहे.