शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

Rishi Sunak: 2015 मध्ये मोदींसमोरच 'भविष्यवाणी' झालेली; 'भारतीय व्यक्ती ब्रिटनचा पंतप्रधान बनेल', खरी झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 09:39 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हा ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी लंडनच्या वेम्बले स्टेडियममध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान बनले. सुनक यांनी मंगळवारी किंग चार्ल्स तिसरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर औपचारिकपणे ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला. बँकर ते राजकारणी असा प्रवास करणारे ४२ वर्षीय सुनक हे २१० वर्षांतील ब्रिटनचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. ते ब्रिटनचे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर भारतीय व्यक्ती बसणार याची भविष्यवाणी २०१५ मध्ये खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच समोर झाली होती. सात वर्षांनी ती खरीदेखील ठरली आहे. 

सुनक यांनी लंडनमध्ये १०, डाउनिंग स्ट्रीट येथे आपल्या पहिल्या संबोधनात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या ब्रिटनवासीयांना यातून बाहेर पडण्याचा विश्वास दिला. राजकारणापेक्षा तुमच्या गरजांना प्राधान्य दिले जाईल. एकत्रितपणे आपण अविश्वसनीय गोष्टी साध्य करू शकतो, असे ते म्हणाले. 

ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेविड कॅमेरून यांनी २०१५ मध्ये केलेले वक्तव्य सात वर्षांनी खरे ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हा ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी लंडनच्या वेम्बले स्टेडियममध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हा अनिवासी भारतीयांना संबोधित करताना तत्कालीन पीएम डेव्हिड कॅमेरून यांनी म्हटले होते, तो दिवस दूर नाहीय, जेव्हा एखादा भारतीय नागरिक ब्रिटनचा पंतप्रधान होईल. आता सात वर्षांनी म्हणजेच २०२२ मध्ये कॅमेरून यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे. भारतीय वंशाचे सुनक ब्रिटनचे पंतप्रधान बनले आहेत.  

टॅग्स :Rishi Sunakऋषी सुनकNarendra Modiनरेंद्र मोदीEnglandइंग्लंड