ऋषी कपूर 'सार्वजनिक शौचालय', काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संताप

By Admin | Updated: May 24, 2016 19:53 IST2016-05-24T19:53:13+5:302016-05-24T19:53:13+5:30

विविध योजनांना गांधी घराण्यातील व्यक्तींचीच नावे का दिली जात आहेत, असा खडा सवाल करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूरच्या नावाने काँग्रेच्या कार्यकर्त्यांनी शौचालय सुरू केले आहे.

Rishi Kapoor's 'public toilets', anger among Congress workers | ऋषी कपूर 'सार्वजनिक शौचालय', काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संताप

ऋषी कपूर 'सार्वजनिक शौचालय', काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संताप

>ऑनलाइन लोकमत
अलाहाबाद, दि. २४ : विविध योजनांना गांधी घराण्यातील व्यक्तींचीच नावे का दिली जात आहेत, असा खडा सवाल करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूरच्या नावाने काँग्रेच्या कार्यकर्त्यांनी शौचालय सुरू केले आहे. अलाहाबाद येथे आज दुपारी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांच्या जमावाने एकत्र येवून शिवाजी पार्क जवळील सार्वजनिक शौचालय'च्या बाहेर ऋषी कपूर कपूर यांच्या नावाचा बोर्ड लावला. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 
अलिकडेच ऋषी कपूर यांनी ट्विटर वरुन गांधी परिवारावर अप्रत्यक्षरित्या टीका करत देशामधील अनेक ठिकाणांना नेहरु - गांधी यांचं नाव देण्यावरुन नाराजी व्यक्त केली होती. ऋषी कपूरने ट्विट करून देशातील विविध योजनांना गांधी घराण्यातील व्यक्तीचा नावावर अक्षेप घेतला होता. प्रत्येक योजनांना गांधी घराण्यातील व्यक्तीचे नाव का देता, असा सवाल करत 'बाप का माल समजा है क्या', असे वादग्रस्त ट्विट केले होते. 
एकट्या दिल्ली शहरामध्येच गांधी कुटुंबाची ६४ ठिकाणांना नावे आहेत, असे कपूर यांनी ट्विटरवरून सांगत छायाचित्रही शेअर केले होते. देशातील महत्त्वाच्या संस्थांना आणि ठिकाणांना कॉंग्रेस सरकारच्या काळात गांधी परिवारातील सदस्यांची नावे दिल्याबद्दल कपूर यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करत कॉंग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला होता
 

Web Title: Rishi Kapoor's 'public toilets', anger among Congress workers