शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

Rishabh Pant Accident: ऋषभ पंतचा लक्झरी कारमध्ये अपघात; किती सुरक्षित होती पंतची Mercedes ? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 14:01 IST

Rishabh Pant Accident: आज सकाळी भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतचा दिल्ली-देहरादून हायवेवर भीषण अपघात झाला आहे.

Rishabh Pant News: भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत याचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. हरिद्वारमध्ये दिल्ली-देहरादून हायवेवर ऋषभची Mercedes कार भरधाव वेगाने डिवायडरवर धडकली. या अपघातात पंतला गंभीर इजा झाली आहे, पण तो सध्या धोक्याबाहेर आहे. उत्तराखंड सरकारने उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. आता प्रश्न हा पडतो की, Mercedes सारखी लक्झरी कार किती सुरक्षित असते. 

Mercedes GLE: सेफ्टी फीचर्स

लक्झरी कार्स खूप महाग असतात, याचे कारण म्हणजे, त्यात असलेले विविध फीचर्स. या कार्स उच्च स्तराच्या सेफ्टी आणि सिक्योरिटी फीचर्ससह येतात. टीओआयच्या रिपोर्टनुसार, ऋषभ पंत Mercedes GLE चालवत होता. पंतच्या मर्सिडीज जीएलएमध्ये मल्टीबीम LED, अडॅप्टिव्ह हायबीम असिस्ट प्लस, 360 डिग्री कॅमेरा पार्किंग पॅकेज, ब्लाइंड स्पॉट असिस्ट, अॅक्टिव्ह ब्रेक असिस्ट, इमरजेंसी स्पेअर व्हील, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीमसारखे फीचर्स आहेत. इतके हायटेक फीचर्स असूनही ऋषभ अपघातात गंभीर जखमी झाला.

नेमका अपघात कसा घडला 

नवी दिल्लीहून रिषभ पंत हा उत्तराखंडच्या रुरकीला जात होता. यावेळी वाटेत सव्वा पाचच्या सुमारास त्याची कार वेगाने नारसन बॉर्डरवरील रेलिंगवर आदळली. यानंतर कारलाही आगली, यावेळी कारचे दरवाजे जाम झाल्याने रिषभ आतच अडकला होता. त्याच्या डोक्याला मार लागला होता. पाठीलाही जखमा झाल्या आहेत. 

उपस्थितांनी रुग्णालयात नेलेयानंतर उपस्थित लोकांनी कारच्या खिडकीची काच फोडून बाहेर काढल्यानंतर रिषभला लोकांनी तातडीने रुडकीच्या सक्षम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, रिषभच्या शरीराला जास्त जखमा नाहीत, परंतू त्याचा एक पाय फ्रॅक्टर असण्याची शक्यता आहे. त्याला देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते, आता त्याला दिल्लीला नेण्यात येणार आहे.

सायरस मिस्त्री यांचाही असाच अपघातकाही महिन्यांपूर्वीच टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्रीयांचाही कार अपघातात मृत्यू झाला. ते आपल्या मित्रांसोबत मर्सिडीज बेंज GLC 220 D 4MATIC कारमधून जात होते. पालघर जिल्ह्यात हा अपघात झाला. सायरस यांनी सीट बेल्ट न लावल्यामुळे अपघात झाला होता. त्यांच्या मर्सिडीज कारमध्येही अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, ब्रेक असिस्ट, सेंट्रल लॉकिंग, पॉवर डोअर लॉक्स, चाइल्ड सेफ्टी लॉक, अँटी-थेफ्ट अलार्मसारखे सेफ्टी फीचर्स होते.

टॅग्स :AccidentअपघातRishabh Pantरिषभ पंतTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ