फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 18:29 IST2025-07-26T18:25:22+5:302025-07-26T18:29:42+5:30
केरळमधील पथानामथिट्टा जिल्ह्यातील पंडालम डेपोमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे.

फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
केरळमधील पथानामथिट्टा जिल्ह्यातील पंडालम डेपोमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. तीन केएसआरटीसी बस चालकांच्या ब्रीथ टेस्टमध्ये अल्कोहोल आढळलं. धक्कादायक बाब म्हणजे या तिन्ही बस चालकांनी दारू प्यायचं तर सोडा, दारूला स्पर्शही केला नव्हता. या घटनेने चालकांनाही मोठा धक्का बसला. तपासाअंती फणस खाणं महागात पडल्याचं समोर आलं.
गेल्या आठवड्यात सर्व चालकांची रूटीन ब्रीथ एनालायजर टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये तीन बस चालकांच्या रक्तात अल्कोहोल लेव्हल १० असल्याचं आढळून आलं, जे कायदेशीर मर्यादेपेक्षा जास्त आहे. त्यांना ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं. रिपोर्ट पाहून सर्व चालकांना धक्का बसला कारण ते दारू प्यायले नव्हते.
तपासात असं दिसून आलं की, काही वेळापूर्वी या बस चालकांनी डेपोमध्ये जवळ ठेवलेला पिकलेला फणस खाल्ला होता. तज्ज्ञांच्या मते, जास्त पिकलेल्या फळांमध्ये थोड्या प्रमाणात अल्कोहोल तयार होऊ शकतं. याच दरम्यान ब्रीथ टेस्ट केल्यास परिणाम दिसू शकतो.
या घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी आणि अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, बस चालकांनी दारू प्यायली नव्हती. त्यामुळे त्यांना दोषी ठरवण्यात आलं नाही. मात्र हा मुद्दा आता लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.