शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

'दिल्लीत झालेली दंगल पूर्वनियोजित होती'; दिल्ली उच्च न्यायालयाची टिपण्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 12:23 PM

Delhi riots: 'दिल्लीतील दंगल अचानकपणे घडली नव्हती, हा एका मोठा पूर्वनियोजित कट होता.'

नवी दिल्ली: फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्लीत मोठी दंगल झाली होती. त्या दंगलीत मोठी जीवित आणि आर्थिकहानी झाली होती. त्या दंगलींबाबत दिल्ली उच्च न्यायालयानं आता मोठं विधान केलं आहे. 'दिल्लीत झालेली दंगल पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आली होती. फिर्यादीने कोर्टात सादर केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये आंदोलकांचे आचरण स्पष्टपणे दर्शवते की, ही एक सुनियोजित दंगल होती, अशी टिप्पणी हायकोर्टाने केली आहे.

हिमाचलच्या लाहौल स्पीतीमध्ये ट्रेकिंगला गेलेले 12 जण अडकले, 2 जणांचा मृत्यू

दिल्ली दंगलीतील आरोपी मोहम्मद इब्राहिमला जामीन नाकारताना, न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद म्हणाले, दंगलखोरांनी शहरातील अनेक ठिकाणांवर लावलेले सीसीटीव्ही बंद केल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या पूर्वनियोजित षडयंत्राची पुष्टी होते. दंगलखोरांनी पोलिस अधिकाऱ्यांवरही लाठ्याकाठ्यांनी निर्दयीपणे हल्ला केल्याचं समोर आलं. ही दंगल अचानकपणे घडली नव्हती, हा एका मोठा पूर्वनियोजित कट होता, असंही कोर्टाने म्हटले आहे.

चीनकडून लवकरच मदतीची पहिली खेप अफगाणिस्तानला जाणार, तालिबानने मानले आभार

आरोपी मोहम्मद इब्राहिमने दंगलीत तलवारीचा वापर केला होता. त्याच्या तलवारीने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पण, त्याच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला की, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, दंगलीत मृत्यू झालेल्या रतनलालचा तलवारीने मृत्यू झाला नाही. इब्राहिमने फक्त स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षा करण्यासाठी तलवार उचलली होती. पण, न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले की, इब्राहिमने तलवार उचलली, यामुळे एखाद्या व्यक्तीला गंभीर दुखापत किंवा मृत्यू होऊ शकतो. अशा शस्त्राचा वापर इब्राहिमने केला, असे म्हणत कोर्टाने त्याला जामीन देण्यास नकार दिला.

टॅग्स :delhi violenceदिल्लीdelhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालय