शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
2
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक? राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
3
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
4
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
5
"ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे"; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत
6
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
7
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
8
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
9
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा
10
हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."
11
Mamata Banerjee : "देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण..."; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
12
“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती
13
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळी मारून हत्या, जॉनी वॅक्टरचा ३७व्या वर्षी मृत्यू
14
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
15
दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर
16
Crorepati Calculator: 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन
17
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
19
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
20
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हुड्डाने मनातली भावना स्पष्टच सांगितली

योग्य वेळी लालू, राहुल गांधींना चोख उत्तर देईन - नितीश कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 4:03 PM

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी माझ्यावर जे आरोप केले आहे.

ठळक मुद्देलालू प्रसाद यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी माझ्यावर आरोप केले आहेत बिहारचा विकास आणि न्याय यांना आपले पहिले प्राधान्य असेल 'मी सांगितलं शंकराप्रमाणे जा आणि राज्य कर, पण हा तर भस्मासूर निघाला',

पाटणा, दि. 17 - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत त्या सर्व आरोपांना मी योग्य वेळी उत्तर देईन असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरुवारी सांगितले. त्यांनी सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारचे हित लक्षात घेऊनच आपण भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. 

लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या आरोपासंबंधी नितीश कुमारांना पत्रकारांनी विचारले त्यावेळी त्यांनी योग्यवेळी उत्तर देऊ असे सांगितले. बिहारचा विकास आणि न्याय यांना आपले पहिले प्राधान्य असेल असे नितीश म्हणाले. बिहारची जनता आणि बिहारच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. मी बिहारची सेवा करत राहीन असे ते यावेळी म्हणाले. दरम्यान याआधी लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेत नितीश कुमार यांच्यावर सडेतोड टीका केली.

'मी सांगितलं शंकराप्रमाणे जा आणि राज्य कर, पण हा तर भस्मासूर निघाला', अशी टीका आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर केली. 'जेव्हा कधी वेळ आली तेव्हा नितीश कुमार यांना पुढे पाठवलं. जर माझ्या मनात पाप असतं तर त्यांना मुख्यमंत्री बनवलं नसतं', असंही लालूप्रसाद यादव यांनी यावेळी सांगितलं. 

'गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मी न्यायालयीन लढाई लढत आहे. पण मला शिक्षा सुनावताना घाई करण्यात आली. नितीश कुमार आणि भाजपाने रचलेलं हे षडयंत्र होतं', असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला. 'नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बिहारमधून बाहेर काढण्यासाठी लोकांनी भाजपाविरोधात जाऊन आम्हाला कौल दिला होता. गोमांस खाल्लं पाहिजे असं मी सांगितल्याचा खोटा प्रचार करण्यात आला, आम्ही जिंकलो तर पाकिस्तानात फटाके फुटतील असंही सांगण्यात आलं होतं', अशी माहिती लालूप्रसाद यादव यांनी दिली. नितीश कुमार खूप मोठे संधीसाधू असल्याचा आरोपही त्यांनी केला. दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.