शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

CBIvsCBI: आलोक वर्मा, राकेश अस्थाना सक्तीच्या रजेवर; नागेश्वर राव अंतरिम संचालकपदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 08:58 IST

सीबीआयमधील वाद चव्हाट्यावर आल्यावर मोदी सरकारची कारवाई

नवी दिल्ली: सीबीआयच्या वरिष्ठांमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धात आता मोदी सरकारनं हस्तक्षेप केला आहे. सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा आणि सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सरकारनं सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. वर्मा यांच्या जागी एम. नागेश्वर यांची अंतरिम संचालकरदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी त्यांच्याकडे सहसंचालकपदाची जबाबदारी होती. नागेश्वर राव 1986 च्या ओदिशा केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. आलोक वर्मा, राकेश अस्थाना यांच्यावर लाचखोरीचे आरोप आहेत. सीबीआयमधील या शीर्षस्थ अधिकाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर आल्यानं मोदी सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली. त्यामुळे वर्मा यांच्या जागी नागेश्वर राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राव यांच्याकडे तातडीनं अंतरिम संचालकपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. सीबीआयनं स्वत:च्याच कार्यालयात छापा टाकून विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. मांस निर्यातदार मोईन कुरेशीकडून ३ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप अस्थाना यांच्यावर आहे. CBI vs CBI: काय आहे नेमकं प्रकरण?, कशावरून घडलं महाभारत?सीबीआय अधिकाऱ्यांमधील या विकोपाला गेलेल्या वादाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. सोमवारी आलोक वर्मा यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. आलोक वर्मा मोदींना भेटल्यानंतर तासाभरात सीबीआयच्या एसआयटीचे उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सीबीआयने अनेक अधिकाऱ्यांच्या घरी-ऑफिसांवर धाडी टाकल्या. देशातील सर्वात मोठ्या तपास संस्थेत पहिल्यांदाच दोन अधिकाऱ्यांमध्ये एवढी मोठी लढाई पाहायला मिळत आहे. राकेश अस्थाना आणि देवेंद्र कुमार यांनी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या सीबीआयच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. सीबीआयचे डिएसपी देवेंद्र कुमार यांनी लाचखोरी प्रकरणातील अटकेविरोधात मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागNarendra Modiनरेंद्र मोदी