कंटेनरच्या धडकेने रिक्षा उलटली

By Admin | Updated: November 3, 2015 23:46 IST2015-11-03T23:46:09+5:302015-11-03T23:46:09+5:30

जळगाव: भुसावळकडून धुळ्याकडे जाणार्‍या कंटेनरने (क्र.आर.जे.१४ जी.सी.८३४३) ओव्हरटेक करताना पुढे चालणार्‍या रिक्षाला (क्र.एम.एच.१९.व्ही ८८६९) धडक दिल्याने रिक्षा रस्त्याच्या खाली उतरुन पलटी झाली. त्यात सुधीर प्रकाश गुरव (वय ४३, रा.इंद्रप्रस्थ नगर मागे) हे प्रवाशी जखमी झाले. हा अपघात सोमवारी संध्याकाळी सात वाजता महामार्गावरील बॉम्बे बेकरीजवळ झाला.यात रिक्षाचे नुकसान झाले आहे. यातील अन्य प्रवाशांना मात्र सुदैवाने कुठलीही इजा झाली नाही. गुरव यांना तातडीने खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मंगळवारी दवाखान्यातच त्यांचा जबाब घेण्यात आला.त्यानुसार गुरव यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघातानंतर कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास कॉन्स्टेबल सलीम पिंजारी करीत आहेत.

Rickshaw dropped by the container's shock | कंटेनरच्या धडकेने रिक्षा उलटली

कंटेनरच्या धडकेने रिक्षा उलटली

गाव: भुसावळकडून धुळ्याकडे जाणार्‍या कंटेनरने (क्र.आर.जे.१४ जी.सी.८३४३) ओव्हरटेक करताना पुढे चालणार्‍या रिक्षाला (क्र.एम.एच.१९.व्ही ८८६९) धडक दिल्याने रिक्षा रस्त्याच्या खाली उतरुन पलटी झाली. त्यात सुधीर प्रकाश गुरव (वय ४३, रा.इंद्रप्रस्थ नगर मागे) हे प्रवाशी जखमी झाले. हा अपघात सोमवारी संध्याकाळी सात वाजता महामार्गावरील बॉम्बे बेकरीजवळ झाला.यात रिक्षाचे नुकसान झाले आहे. यातील अन्य प्रवाशांना मात्र सुदैवाने कुठलीही इजा झाली नाही. गुरव यांना तातडीने खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मंगळवारी दवाखान्यातच त्यांचा जबाब घेण्यात आला.त्यानुसार गुरव यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघातानंतर कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास कॉन्स्टेबल सलीम पिंजारी करीत आहेत.

Web Title: Rickshaw dropped by the container's shock