शहरं
Join us  
Trending Stories
1
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
2
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
3
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
4
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
5
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
6
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
7
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
8
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
9
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
10
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
11
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
12
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
13
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
14
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
16
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
17
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
18
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
19
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
20
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'

देशातील सर्वात श्रीमंत IPS अधिकारी; मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त संपत्ती, कुठून आला एवढा पैसा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 3:28 PM

Richest IPS officer in India: 2004 बॅचचे आयपीएस अधिकारी गुरप्रीत सिंग भुल्लर देशातील सर्वात श्रीमंत IPS अधिकारी आहेत.

Richest IPS officer in India: देशात अनेक IAS-IPS अधिकारी आहेत, ज्यांची संपत्ती लाखो-करोडोंमध्ये आहे. पण, पंजाब केडरचे IPS गुरप्रीतसिंग भुल्लर हे देशातील सर्वात श्रीमंत IPS अधिकारी आहेत. 2016 मध्ये ते आपल्या संपत्तीची घोषणा करुन प्रकाशझोतात आले होते. विशेष म्हणजे, त्यावेळी त्यांची संपत्ती माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सुखबीर सिंग बादल यांच्यापेक्षाही खूप जास्त होती. अशातच एका सरकारी कर्मचाऱ्याकडे इतका पैसा कुठून आला, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला तर मग जाणून घेऊ...

आयपीएस गुरप्रीत सिंग भुल्लर (IPS Gurpreet Singh Bhullar) यांनी आयजी (IG) पदावर पदोन्नती होण्यापूर्वी लुधियानाचे पोलिस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. याशिवाय, अनेक वर्षे ते मोहालीचे एसएसपी होते. त्यांनी 2009 ते 2013 आणि 2015 ते ऑगस्ट 2016, या काळात मोहालीचे एसएसपी पद सांभाळले.

आजोबाही आयपीएस अधिकारी...गुरप्रीतसिंग भुल्लर हे 2004 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी बीए ऑनर्स पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर युपीएससी परीक्षा देऊन भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. विशेष म्हणजे, त्यांचे आजोबा गुरदियालसिंग भुल्लर हेदेखील आयपीएस अधिकारी होते. गुरदियाल सिंग भुल्लर हे 1957 ते 1960 दरम्यान जालंधरचे एसएसपी होते.

एवढी संपत्ती...IPS गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी 2016 मध्ये 152 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. संपत्ती जाहीर करताना त्यांनी आठ घरे, चार ठिकाणी शेती आणि तीन व्यावसायिक भूखंड असल्याचे सांगितले. याशिवाय, त्यांच्याकडे 85 लाख रुपयांची व्यावसायिक मालमत्ता आणि सैनिक फार्म, दिल्ली येथे 1500 स्क्वेअर यार्डचा भूखंडदेखील आहे. तसेच, मोहालीतील एका गावात त्यांची 45 कोटी रुपयांची जमीन असल्याचेही त्यांनी सांगितले. 

वारसा मिळालेली मालमत्तात्यांनी सरकारकडे नमुद केल्यानुसार, त्यांच्याकडे असलेली बहुतांश मालमत्ता वारशाने मिळालेली आहे. ही सर्व मालमत्ता त्यांना आजी-आजोबांकडून मिळाल्याचा उल्लेख कागदपत्रांमध्ये आहे. विशेष म्हणजे, पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांची एकूण संपत्ती 48 कोटी रुपये, तर सुखबीरसिंग बादल यांची एकूण संपत्ती 102 कोटी रुपये होती. या दोन्ही मुख्यमंत्र्यांपेक्षा गुरप्रीतसिंग भुल्लर यांच्याकडे कैक पटीने जास्त संपत्ती आहे.

टॅग्स :PoliceपोलिसPunjabपंजाबChief Ministerमुख्यमंत्रीGovernmentसरकारEmployeeकर्मचारी