स्वत:ची मुलगी दिली मित्रांना बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:44 IST2018-04-20T00:44:14+5:302018-04-20T00:44:14+5:30

उत्तर प्रदेशात भयानक प्रकार : सामूहिक बलात्कारात बापही झाला सहभागी

Reward your friends with your daughter | स्वत:ची मुलगी दिली मित्रांना बक्षीस

स्वत:ची मुलगी दिली मित्रांना बक्षीस

सीतापूर : उत्तर प्रदेशातील सीतापूरमधील एका बापानेच ३५ वर्षांची विवाहित मुलगी आपल्या मित्रांना बक्षीस म्हणून दिली आणि त्यांच्याबरोबरच स्वत:च्या मुलीवर बलात्कार केला, असे उघडकीस आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मात्र तो बाप अद्याप फरार आहे.
सीतापूरहून जवळच असलेल्या कमालपूर नावाच्या गावात जत्रा होती. तिथे हा बाप १५ एप्रिल रोजी मुलीला घेऊन गेला. तिथे त्याने मानसिंह नावाच्या गुन्हेगार मित्राला बोलावून घेतले. सारे फिरायला जाऊ, असे सांगून मुलीला मानसिंहच्या बाइकवर बसायला सांगितले. तेथून मानसिंह तिच्यासह मेराज नावाच्या मित्राच्या घरी गेला. तिथे त्याने व त्याच्या दोन मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिथे पोहोचलेल्या बापानेही मुलीवर बलात्कार केला.
नंतर या महिलेला मेराजच्या घरी १८ तास कोंडून ठेवण्यात आले. तिची सोमवारी सुटका करण्यात आली. त्यानंतर घरी येऊ न तिने हा सारा प्रकार आपल्या आईला सांगितला. आईने शेजाऱ्यांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच महिलेचा बाप, मानसिंह, मेराज आणि इतरांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यापैकी मेराजला व अन्य दोघांना लगेच अटक करण्यात आली. (वृत्तसंस्था)

मुलीवर बलात्कार प्रकरणीच होता जामिनावर
या पीडित महिलेचा १६ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर दोन वर्षांनी पती सतत भांडत असल्याने माहेरी निघून आली होती. तिच्यावर बापाने नोव्हेंबर २0१७मध्येही बलात्कार केला होता. त्याबद्दल त्याला अटक झाली होती आणि तो सध्या जामिनावर होता. गावकºयांनी त्याला बराच काळ गावात येण्यास बंदी घातली होती. ती उठल्यानंतर तो परत आला आणि हा अतिशय गलिच्छ व लज्जास्पद प्रकार केला.

Web Title: Reward your friends with your daughter