शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

राम रहीमच्या हनीप्रीतची माहिती देणाऱ्याला मिळणार बक्षीस, सामाजिक कार्यकर्त्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 21:57 IST

दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याची मानस मुलगी हनीप्रीत सध्या फरार आहे. तिची माहिती देण्या-या व्यक्तीला बक्षीस देण्याची घोषणा एका सामाजिक कार्यकर्त्याने केली  आहे.

ठळक मुद्देहनीप्रीतची माहिती देणाऱ्या व्यक्तीस बक्षीस हनीप्रीत सध्या फरार आहेहनीप्रीतचे पोस्टर्सही लावण्यात आले आहेत

शाहजहांपुर, दि. 22 - दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याची मानस मुलगी हनीप्रीत सध्या फरार आहे. तिची माहिती देण्या-या व्यक्तीला बक्षीस देण्याची घोषणा एका सामाजिक कार्यकर्त्याने केली  आहे.हनीप्रीतचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. हनीप्रीतला पकडण्यासाठी पोलिसांकडून अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आले आहेत. मात्र, अद्याप हनीप्रीत पोलिसांच्या हाती लागलेली नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने हनीप्रीतची माहिती देणाऱ्या व्यक्तीस बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.  फकीरेलाल भोजवाल असे या समाजसेवकाचे नाव असून त्यांनी हनीप्रीतची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपये रोकड देण्याची घोषणा केली आहे. तसेच, शहरातील अनेक भागात हनीप्रीतचे पोस्टर्सही लावण्यात आले आहेत. दरम्यान, याप्रकरणी समाजसेवक फकीरेलाल भोजवाल यांनी सांगितले की, समाजात असे अनेक बाबा आहेत, जे लोकांच्या भावनांसोबत खेळत आहेत. अशा बाबांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले पाहिजे. हनीप्रीतची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी सुद्धा बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. मात्र, मी स्वत: हनीप्रीतची माहिती देणाऱ्या व्यक्तीला एक लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे त्यांनी सांगितले. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला 25 ऑगस्टला बलात्कार प्रकरणी दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांनी 25 ऑगस्टला हिंसाचार माजवला. या हिंसाचारात 38 जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले. तसेच, यामध्ये पोलिसही जखमी झाले. दरम्यान,या हिंसाचारामागे हनीप्रीत हिचा हात असल्याचा आरोप आहे. या हिंसाचारानंतर ती फरार झाली असू तिचा पोलीस शोध घेत आहेत. दुसरीकडे, आज हनीप्रीत आणि बाबा गुरमीत राम रहीम यांच्या नात्यासंबंधी विश्वास गुप्ताने धक्कादायक खुलासे केले आहेत. विश्वास गुप्ता हनीप्रीतचा पूर्वपती आहे. मी राम रहीम आणि हनीप्रीतला एकत्र नेकेड, सेक्स करताना बघितले होते असे विश्वास गुप्ताने पत्रकार परीषदेत सांगितले. मी जेव्हा दोघांना एकत्र सेक्स करताना पकडले तेव्हा राम रहीमने मला जीवे मारण्याची धमकी दिली होती असेही विश्वास गुप्ताने  सांगितले. 

टॅग्स :Baba Ram Rahimबाबा राम रहीमGurmeet Ram Rahimगुरमीत राम रहीमCourtन्यायालयPoliceपोलिस