एसआयटीच्या बैठकीत हसन अलीच्या संपत्तीचा आढावा -----
By Admin | Updated: June 3, 2014 00:59 IST2014-06-03T00:59:28+5:302014-06-03T00:59:28+5:30
फराझ अहमद/नवी दिल्ली : परदेशी बँकेतील भारतीयांच्या काळ्या पैशाच्या चौकशीसाठी स्थापन उच्चस्तरीय विशेष तपास पथकाची (एसआयटी) पहिली बैठक सोमवारी झाली. ही बैठक दोन तास चालली. बैठकीत एसआयटीने घोडे व्यापारी हसन अली खान आणि त्याचा साथीदार काशीनाथ तापुरिया यांच्या बेहिशेबी संपत्ती प्रकरणाचादेखील आढावा घेतला.

एसआयटीच्या बैठकीत हसन अलीच्या संपत्तीचा आढावा -----
फ ाझ अहमद/नवी दिल्ली : परदेशी बँकेतील भारतीयांच्या काळ्या पैशाच्या चौकशीसाठी स्थापन उच्चस्तरीय विशेष तपास पथकाची (एसआयटी) पहिली बैठक सोमवारी झाली. ही बैठक दोन तास चालली. बैठकीत एसआयटीने घोडे व्यापारी हसन अली खान आणि त्याचा साथीदार काशीनाथ तापुरिया यांच्या बेहिशेबी संपत्ती प्रकरणाचादेखील आढावा घेतला. हसन अली मनी लाँडरिंगप्रकरणी सध्या तुरुंगात आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून त्यांची व तापुरियाची चौकशी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व एसआयटी अध्यक्ष एम. बी. शहा व एसआयटीचे उपाध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. अरिजित पसायत बैठकीला उपस्थित होते. सरकारी उच्चस्तरीय संस्था व विभागाचे ११ वरिष्ठ अधिकारीही बैठकीत सहभागी झाले. त्यात महसूल गुप्तचर संचालनालयाचे महासंचालक, रॉचे सचिव आणि अर्थ मंत्रालयाचे ( विदेशी कर आणि कर संशोधन) सहसचिव यांचा सहभाग होता. महसूल विभागाचे सचिव, आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर, गुप्तचर विभागाचे (आयबी) संचालक, अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) संचालक, सीबीआय संचालक, सीबीडीटी अध्यक्ष आणि नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक एसआयटीचे सदस्य आहेत. ही बैठक नॉर्थ ब्लॉकमध्ये आयोजित करण्यात आली होती. काळ्या पैशाबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सरकारने २७ मे रोजी एसआयटी स्थापन करण्याबद्दल अधिसूचना काढली होती. परदेशी बँकेतील भारतीयांच्या बेहिशेबी संपत्तीची तसेच भारतातून परदेशी बँकेत जमा केलेल्या बेहिशबी संपत्तीची चौकशी एसआयटी करणार आहे, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने म्हटले आहे. --------