जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा विभागस्तरीय बैठक अंतिम निर्णय मुंबईत
By Admin | Updated: February 18, 2015 23:53 IST2015-02-18T23:53:53+5:302015-02-18T23:53:53+5:30
नागपूर: २०१४-१५ या वर्षाच्या तुलनेत २०१५-१६ च्या प्रत्येक जिल्ांच्या वार्षिक योजनांमध्ये वाढ केली जाईल. यासंदर्भात मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा विभागस्तरीय बैठक अंतिम निर्णय मुंबईत
न गपूर: २०१४-१५ या वर्षाच्या तुलनेत २०१५-१६ च्या प्रत्येक जिल्ह्यांच्या वार्षिक योजनांमध्ये वाढ केली जाईल. यासंदर्भात मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांच्या वार्षिक योजनांचा आढावा सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. यावेळी अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह प्रत्येक जिल्ह्याचे आमदार आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हानिहाय आढावा घेऊन मुनगंटीवार यांनी काही सूचनाही केल्या. प्रत्येक जिल्ह्यातून वाढीव मागण्या आल्या. त्यावरही बैठकीत चर्चा झाली. जिल्हा योजनेचा निधी त्याच कामावर खर्च करावा आणि अतिरिक्त मागण्यांसाठी राज्य आणि केंद्राच्या योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्याबाबत जिल्ह्यांना आश्वासन देण्यात आले. बैठकीला विभागीय आयुक्त अनुपकुमार, सहाही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते.चौकटजिल्हानिहाय सर्वसाधार योजना (रक्कम कोटीत)जिल्हा तरतूद वाढीव मागण्यानागपूर १८०.४७ २६४.१२वर्धा ८२.६५ ६३.४६भंडारा ७०.२७ ९९.३८गोंदिया ८०.९३ ९४.५५चंद्रपूर १३५.०३ १०६.७५गडचिरोली ११८.६६ १५१.७१