शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Sidhu Moose Wala : '2 दिवसांत घेणार सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा बदला', नीरज बवाना गँगची घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 22:57 IST

Neeraj Bawana : नीरज बवाना गँगने धमकी देताना, सिद्धू मुसेवाला हा आपला भाऊ होता आणि आपण दोन दिवसांच्या आत त्याच्या हत्येचा बदला घेणार, असे उघडपणे म्हटले आहे.

पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवाला हत्याकांडानंतर, आता पुन्हा एकदा पंजाबमध्ये गँगवार सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विक्की डोंगर आणि दविंदर बंबीहा गँगनंतर आता नीरज बवाना गँग देखील उघडपणे मैदानात उतरली आहे. कथितरित्या, नीरज बवाना गँगने एका फेसबूक पोस्टमध्ये, सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा निषेध करत, आपण दोन दिवसांच्या आत मुसेवालाच्या हत्येचा बदला घेणार, अशी उघड धमकी दिली आहे. 

नीरज बवाना गँगने धमकी देताना, सिद्धू मुसेवाला हा आपला भाऊ होता आणि आपण दोन दिवसांच्या आत त्याच्या हत्येचा बदला घेणार, असे उघडपणे म्हटले आहे. नीरज बवानाचे नाव नुकतेच पैलवान सुशील कुमार प्रकरणातही समोर आले होते.

कोन आहे नीरज बवाना?नीरज बवाना हा दिल्लीतील बवाना गावचा रहिवासी आहे. यामुळेच त्यांच्या नावासोबत बवाना जोडले गेले आहे. नीरजवर खून, दरोडा, खंडणी, लोकांना धमकावणे, जीवे मारण्याची धमकी देणे, असे अनेक गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे केवळ दिल्लीतच नाही, तर दिल्लीबाहेरील पोलीस ठाण्यांतही नोंदवले गेलेले आहेत.  सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असलेला नीरज बवाना तुरुंगातूनच आपली गँग चालवत आहे. एवढेच नाही, तर नीरजचे गुंड त्याचे सोशल मीडिया वरील अकाउंट देखील सांभळतात.

नीरजच्या गँगबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांच्या गँगमध्ये स्थानिक गुंडांशिवाय उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधील गुंडही आहेत. यांचा दरोडा, खंडणी आणि खुनाच्या गुन्ह्यांमध्ये सर्रास समावेश असतो. 

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारीFacebookफेसबुक