अधिकार्यांविषयक तक्रारींवर ऑनलाईन उतारा
By Admin | Updated: September 11, 2015 21:24 IST2015-09-11T21:24:58+5:302015-09-11T21:24:58+5:30
विशेष मोहीम : चार महिन्यांत करणार निपटारा

अधिकार्यांविषयक तक्रारींवर ऑनलाईन उतारा
व शेष मोहीम : चार महिन्यांत करणार निपटारायवतमाळ : राज्यातील अधिकार्यांकडून येणार्या सेवांविषयक तक्रारींची वाढती संख्या लक्षात घेता शासनान विशेष मोहीम हाती घेतली आहे. ऑनलाईन तक्रारी मागविल्या असून येत्या चार महिन्यांत सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे.बदलीसह विविध मुद्यांबाबत महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील अधिकार्यांच्या अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. याबाबत हे अधिकारी थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करतात. त्यातूनही त्यांचे प्रश्न सुटत नाही आणि हे अधिकारी न्यायालयाचे दार ठोठावतात. या सर्वांचा विचार करता शासनाने ही विशेष मोहीम सुरू करणार आहे.त्यानुसार १५ सप्टेंबर ते १५ जानेवारी २०१६ या चार महिन्यांत प्रत्येक तक्रारीचा निपटारा करण्यात येणार आहे. यातील पहिला महिनाभर (१५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर) ऑनलाइन तक्रारी मागविण्यात आल्या आहे. त्यानंतर या तक्रारींचे वर्गीकरण करून १५ जानेवारीपर्यंत निपटारा करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)---निवृत्तांना दिलासा, सेवारतांना प्रोत्साहनसेवानिवृत्त अधिकार्यांच्या प्रश्नांचाही यात समावेश राहणार आहे. अनेक निवृत्त अधिकार्यांचे पेन्शनचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे या मोहिमेतून त्यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.